रेल्वे स्टेशनपर्यंत शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन
बीड. (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी यांना बीड बस स्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंत शहर बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येत्या 17 सप्टेंबर 2025 पासून बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा रेग्युलर सुरू होणार आहे बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून रेल्वे स्थानकाचे अंतर चार ते पाच किलोमीटर एवढे आहे बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांना तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च हा न परवडणार आहे तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची फार मोठी गैरसोय त्यामुळे होणार आहे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 17 सप्टेंबर पूर्वी बीड बस स्थानक ते रेल्वे स्थानकापर्यंत तातडीने शहर बस वाहतूक सुरू करावी याकरिता निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा महासचिव खंडू जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर, ज्ञानेश्वर कवठेकर, अर्जुन जवंजाळ, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश कुमार जोगदंड, सम्यक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहन मगर, युवा नेते प्रकाश उजगरे बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड, मिलिंद सरपते, अमर ससाने, प्रदीप खळगे इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment