भारदे साक्षरता प्रसारक मंडळ बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगांव आयोजित महाराष्ट्रातील नामवंत गंगा- मृणालिनी स्मृती' व्याख्यानमालेचे आयोजन


[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270442511

दिनांक 09/092025 वर मंगळवार शेवगाव (प्रतिनिधी) या बाबत सविस्तर वृत्त असे की शैक्षणिक , साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने दि 8 सप्टेंबर सोमवार ते 13 सप्टेंबर 2025 शनिवार या कालावधीत 'गंगा- मृणालिनी स्मृती' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे व निमंत्रक हरीश भारदे यांनी दिली. रोज सकाळी साडेदहा ते बारा यावेळेत पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील रावसाहेब पटवर्धन सभागृहात सदर व्याख्याने होणार आहेत. काल सोमवार दि 8 सप्टेंबर रोजी यजुवेंद्र महाजन ( स्पर्धा परिक्षेवर बोलू काही) या वर व्याख्यान पार पडले आज मंगळवार दि 9 सप्टेंबर रोजी प्रवीण दवणे ( दीपस्तंभ, मनातले...जनातले) यावर व्याख्यान उद्या 10 सप्टेंबर रोजी गणेश शिंदे ( मोगरा फुलला) 11 सप्टेंबर रोजी डॉ.अंजली धानोरकर( झपाटले पण ते जाणतेपण) 12 सप्टेंबर रोजी मुक्ता चैतन्य( मोबाईलचे व्यसन आणि आव्हाने) तर 13 सप्टेंबर रोजी प्रख्यात माध्यमतज्ज्ञ व एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांचे समाज माध्यमे व आजची पत्रकारिता असे या व्याख्यानमालेचे नियोजन असून शेवगाव करांना उत्तमोत्तम व्याख्यात्यांचे उत्तमोतम् विषयावरील विचार ऐकता यावेत व यातून विधायक विचार मंथन घडावे हा या आयोजना मागील हेतू असल्याने सर्वांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त सौ. रागिनीताई भारदे यांनी केले आहे.




भारदे साक्षरता प्रसारक मंडळ बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगांव कायमच आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यंसाठी प्रेरणादायी उपक्रमाअंतर्गत देशपातळीवर गाजलेले विविध कालगुणसंपन्न प्रतिभा वाण कलाकारांना शेवगावकरांच्या भेटीला घेऊन येत असते

( क्रमशः)  


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी