शेवगांव चा सार्वजनिक गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडला
[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755
शेवगाव, दि, 07 सप्टेंबर 2025 वर रविवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरात
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात श्री गणरायाला शेवगाव शहर व तालुक्यातून ठिकठिकाणी शांततेत भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशा, सनई चौघड्याच्या पारपारिक वाद्याच्या तालात तसेच नाशिक ढोल लेझीम, झांज, टाळ – मृदुंगाच्या पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या अनुक्रमे लाटे सार्वजनिक गणेश उत्सव भोईराज पंचमंडळ शिवशक्ती मित्र मंडळ शहीद भगतसिंग गणेश मंडळ व बालाजी गणेश मित्र मंडळ या सहा सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. शेवटच्या गणेश मंडळाचे विसर्जनाला रात्रीचे साडेबारा वाजले.
प्रशासनाच्या आदेशानुसार नगरपरिषदेने यंदा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती विसर्जनाचे ठीक ठिकाणी कृत्रिम तलावांचे आयोजन केले. त्यासाठी शहरात कृत्रिम तलाव उभारून गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती . तर जोहरापूरच्या ढोरा नदीवर नगर परिषदेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली . मंडळाचे कार्यकर्ते व गणेश भक्तांच्या उपस्थितीतच मूर्ति क्रेनच्या सहाय्याने नदीत बुडवून परत बाहेर काढून संकलित संकलित केल्या आहेत . शेवगावाला गणेशोत्सवा ची मोठी परंपरा आहे . 1 परंपरेनुसार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव जाधव यांच्या पेशवेकालीन गणपतीची व त्यानंतर लाटे यांच्या मानाच्या गणपतीची नायब तहसीलदार गौरी कट्टे, निलेश वाघमारे,पो. नि .संतोष मुटकुळे , नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, यांचे हस्ते आरती झाल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास मुख्य विसर्जन मिरवणूक सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी दामाजीक कार्यकर्ते सुनिल रासने, लाटे गणेश उत्सवाचे प्रमुख महेश लाटे, अचल लाटे, शेतकरी नेते दत्ता फुंदे जेष्ठ पत्रकार लांडे आबा श्यामराव पुरोहित शिवसेना तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे यांच्यासह गणेश भक्तांची उपस्थिती होती. शहरातील विविध मार्गावर ईतर सार्वजनिक मंडळांनी स्वतंत्ररीत्या मिरवणुका काढून दुपारच्या आत आपआपल्या मंडळाच्या श्रीगणेशाचे स्वतंत्रपणे पर्यावरपुरक विसर्जन केले. मुख्य मिरवणुकीत मिरवणुकीत शिवशक्ती मंडळाच्या मुलींचे झाँज आणि लेझीम पथक लक्षवेधी होते. तर दुसऱ्या मानाच्या भोईराज तरुण मंडळाच्या झांज व ढोल पथकाने तसेच ठीक ठिकाणी गुलाल व फुलांची उधळण करणाऱ्या लोखंडी तोफेने रंगत भरली.
भगतसिग मंडळाच्या पथकाने तसेच बालाजी गणेश मंडळाने काढलेल्या मिरवणुकीने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. शेवगावात गणपती विसर्जनाच्या पूर्व संधेला एक दिवसासाठी जीवंत देखावे आरास सादर करण्याची जुनी परंपरा आहे. यावेळी राजभोई मंडळाने मावा घुटक्याचे व सिगारेट चे दुष्परीणाम, तर श्रीकृष्ण मंडळाने अंधश्रध्दा निर्मुलन अंगारे धुपारे विषयी हे सामाजिक विषय परिणामकारकपणे दाखविले . तसेच मानाच्या शिवशक्ती मंडळ माळीगल्लीने भस्मासुराचा वध हा भव्य ऐतिहासिक देखावा हनुमान गणेश मंडळाने महाभारतातील भगवान श्रीकृष्णाचे विराट दर्शन तर शहीद भगत सिंग मित्र मंडळाने कालीया मर्दन हे पौराणिक देखावे सादर केले होते. हजारो गणेश भक्तानी याचा मनमुराद आनंद घेतला.
शेवगांवचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्श्नाखाली शेवगांवच्या पोलिसांनी पहिल्या दिवसापासून चोख बंदोबस्त ठेवला होता. या वर्षी 90 डेसिबल आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या सुमारे सहा मंडळांवर आणि डि. जे. मालकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
Comments
Post a Comment