नरेगा मध्ये होत असलेल्या गैरव्यवहारांची चौकशी लावण्यात यावी-अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड




बीड - बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या निरीक्षणात आले आहे की, बीड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नरेगा)अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये (उदा. विहीर, वृक्षारोपण, फळबाग, तलाव, गाय गोठा, कांदा चाळ, रस्ते, नाले, ब्लॉक इत्यादी) मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी संबंधित नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत.
विशेषतः बीड तालुक्यातील वरवटी, चराटा, अंजनवती, लिंबागणेश तसेच वडवणी तालुक्यातील काही गावांमध्ये संबंधित कामांमध्ये लाभार्थ्यांना लाच न देता कोणतेही काम मिळत नाही अशी परिस्थिती आहे. शिवाय, अनेक लाभार्थ्यांना काम झाले असतानाही त्यांच्या पेमेंटमध्ये अनावश्यक विलंब केला जातो किंवा ते दिलेच जात नाही, असेही निदर्शनास आले आहे.
सदर प्रकार अत्यंत गंभीर असून, यामुळे शासनाच्या विश्वासार्हतेवर व जनतेच्या अपेक्षांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आपण कृपया याप्रकरणी तातडीने चौकशी लावून दोषींवर कडक कारवाई करावी.
जर या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर आम आदमी पार्टी बीड जिल्ह्यातील पीडित नागरिकांना घेऊन आपल्या कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन मा. उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष रफिक पठाण अल्पसंख्यांक संकेत विभाग प्रमुख शकील पठाण सय्यद सादेक शहराध्यक्ष कृष्णा जगताप तालुका अध्यक्ष मिलिंद पाळणे कैलास पालीवाल इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी