ढाळेवाडीची कन्या प्रितम हुले हिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याने पाटोदा तालुक्याचा अभिमान उंचावला
पाटोदा (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष 2025-26 या अंतर्गत तालुका क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी जय हनुमान तालीम, चुंबळी फाटा (ता. पाटोदा, जि. बीड) येथे करण्यात आले. विविध खेळांच्या अनुषंगाने पार पडलेल्या फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत पाटोदा तालुक्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.यामध्ये ढाळेवाडी (ता. पाटोदा) येथील कुमारी प्रितम शामराव हुले हिने उत्तुंग कामगिरी करून आपले कुस्तीतील कौशल्य सिद्ध केले. 14 वर्षे वयोगट व 36 किलो वजनी गटात प्रितम हिने झुंजार लढती देत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिच्या या यशामुळे संपूर्ण पाटोदा तालुक्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.प्रितम ही ढाळेवाडी येथील युवानेते शामराव हुले यांची कन्या असून तिचे वडील शामराव हुले यांनी आपल्या मुलीच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य प्रशिक्षण यांच्या जोरावर प्रितमने हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले.गावातील ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार तसेच तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी प्रितमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “प्रितमने दाखवलेली जिद्द व चिकाटी हीच तिच्या यशाची गुरुकिल्ली आहे. जिल्हास्तरावरच नव्हे तर भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरदेखील ती नावलौकिक मिळवेल,” असा विश्वास तालुक्यातील क्रीडा जाणकारांनी व्यक्त केला आहे. प्रितम हुले हिच्या या उल्लेखनीय यशामुळे ढाळेवाडी व पाटोदा तालुक्याचा मान अभिमानाने उंचावली आहे. येणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment