सुजात आंबेडकर यांची परळीत 29 सप्टेंबर रोजी "एल्गार सभा"
परळी प्रतिनिधी - परळी शहरात 29 सप्टेंबर रोजी सुजाता आंबेडकर यांची एल्गार जाहीर सभा आयोजित करण्यात आली. जिल्हा याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.5 सप्टेंबर 2025 रोजी परळी शहर संपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रसंनजीत रोडे सहसचिव अँड. संजय रोडे , जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात येऊन या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व वचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अँड. बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव युवकांचे हृदय सम्राट सुजाता आंबेडकर यांचा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका यांच्या होऊ घातलेल्या निवडणुक पूर्वीचा झंजावात सुरू झाला असून याचाच एक भाग म्हणून परळी शहरात वंचितची एल्गार सभाच नव्हे तर वंचितांच्या हक्काचा आणि स्वाभिमानाचा रणघोष असून सुजात आंबेडकर यांची सभा ठरवेल उद्याचा बदल त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आली असून या सभेच्या पूर्वनियोजित तयारीसाठी काल परळी शहर तालुक्यातील अनेक पदाधिकारी हीतचिंतक व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष एच.टी. वाघमारे. समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ.स्वप्निल महाळंगीकर, यशपाल बचाटे, डॉ. सिद्धार्थ जगतकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी यासह विविध शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एल्गार सभेच्या तयारीसाठी याच बैठकीत 70 हजार रुपये जमा झाले असून पुढील होणाऱ्या सभेसाठी सर्व कार्यकर्ते हितचिंतक व पदाधिकारी यांनी तन मन धन लावून काम करावे असेही आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम साळवे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव ज्ञानेश्वर गीते, उपाध्यक्ष अवि मुंडे वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष संदीप ताटे नंदकुमार सावंत, जयपाल जगतकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे परळी शहराध्यक्ष प्रेम जगतकर, सिद्धूधन आचार्य, आदर्श जंगले यांच्यासह जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी इत्यादीने केले असून या बैठकीस अनिल अवचार, अजय वावळे, संदीप गायकवाड, वैभव मस्के, प्रेम मस्के, राष्ट्रपाल केदारे, राहुल बचाटे, विकास पवार, विकास चोपडे, विजय झिंजुर्डे, धम्मपाल किरवले, विजय झिंजुर्डे, केशव कांबळे, अभिनव मस्के, संदेश आदोडे, संतोष वावळे, समाधान कांबळे, ब्रह्मानंद साळवे, प्रभाकर गावडे, प्रमोद रोडे, उत्तम रोडे, नवनाथ रोडे, बालासाहेब बनसोडे, सुभाष रोडे, बाळासाहेब किरवले, यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment