भारतीय बौद्ध महासभेचे 17 सप्टेंबर रोजीजन आक्रोश आंदोलन -भीमराव आंबेडकर

एकाच दिवशी महाराष्ट्रभर आंदोलन

बीड प्रतिनिधी - महाबोधी महाविहार मुक्ती, महू जन्मभूमी आणि नागपूर दिक्षाभूमीसाठी देशभरातील सर्व मंत्रालयावर व बीड जिल्हाधिकारी कार्यालयांवर जन आक्रोश मोर्चा 17 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान व जेथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले, त्या बुद्धगयातील

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे (1891) आद्य प्रणेते अनागरीक धम्मपाल यांच्या जयंती दिनानिमित्त तसेच दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती, महू जन्म भर्मी आणि नागपुर दिक्षाभूमीसाठी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि बद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौध्द महासभा), बौद्ध महासभा भिक्खू संघ, समता सैनिक दल व आंबेडकरी बहुजन समाजाच्या समविचारी संस्था, संघटनेच्या वतीने संपूर्ण देशभरालील सर्व मंत्रालयावर व जिल्हाधिकारी कार्यालयावर 17 सप्टेंबर, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता जनआक्रोश मोर्चा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील व बीड शहरातील सर्व धम्म बांधव व उपासकांनी सहभाग नोंदवा असे आव्हान भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे समता सैनिक दलाचे संरक्षण सचिव अमरसिंह ढाका यांनी केले आहे.

मुंबई मध्ये मुंबई प्रदेश शाखा व त्यांच्या अंतर्गत सर्व शाखा, महाराष्ट्र राज्य शाखेतील ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्हा शाखांच्या वतीने राणीचा बाग, भायखळा ते मंत्रालय (आझाद मैदान) मुंबई येथे प्रचंड जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये डॉ. भीमराव य. आंबेडकर सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालया येथे उपस्थित रहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी