आईच्या वाढदिवसा निमित्त मुलाचा माणुसकीचा झरा अनाथ मुलांना अन्नधान्य व कपडे वाटप करून केला वाढदिवस साजरा
पाटोदा (प्रतिनिधी) सौ.मंगल रामराव जवळकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या पुत्र प्रकाश जवळकर यांच्या वतीने पसायदान प्रकल्प, ढेकानमोह आणि जिव्हाळा प्रकल्प, बीड येथे अन्नधान्य व कपड्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत गरजू कुटुंबांना धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला असून, त्याला स्थानिक ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले.
प्रकाश जवळकर यांनी यावेळी सांगितले की, “आईच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी काही सकारात्मक करावे या हेतूने हा उपक्रम राबवला. पुढील काळातही असे उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस आहे.”या उपक्रमामुळे अनेक गरजूंना थोडा दिलासा मिळाला असून, प्रकाश जवळकर यांच्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा आणि सेवाभावातून साकारलेला उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment