जिथे विषय गंभीर तिथे सुरेश आण्णाचा मावळा नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव खंबीर
पाटोदा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायत,पोलीस प्रशासन,शैक्षणिक संस्थांची संयुक्त बैठक; विद्यार्थ्यांसह महिलांच्या सुरक्षेसाठी एकत्रित घेणार पुढाकार
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील वाढते अपघात, महिला सुरक्षेचे प्रश्न, तसेच विद्यार्थी व पालकांच्या मनात असलेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश आण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा नगरपंचायत कार्यालयात एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव, पोलीस निरीक्षक जाधव साहेब, शिक्षण अधिकारी गांगुर्डे साहेब यांच्यासह शहरातील शाळा, कॉलेज, व क्लासेसचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत शहराच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले प्रत्येक चौकात होणार सीसीटीव्ही निगराणी नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांनी शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले,
पुढील एका महिन्याच्या आत आमदार सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा शहरातील सर्व प्रमुख चौक व गर्दीची ठिकाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, तसेच प्रशासनाला देखील मदत होईल.पाटोदा पोलीस स्टेशनचे दामिनी पथक होणार सक्रीय; शाळा- कॉलेजमध्ये 'किंवार कोड' बसवण्यात येणार पोलिस निरीक्षक जाधव साहेब यांनी विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेसाठी पुढील पावले उचलण्याची घोषणा केली. शहरातील सर्व शाळा, कॉलेज व क्लासेसमध्ये 'किंवार कोड' (Police Emergency Contact Code) लावण्यात येणार असून विद्यार्थ्यांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती भासताच थेट पोलिसांशी संपर्क साधता येईल. यासोबतच दामिनी पथक अधिक सक्रिय करून परिसरात गस्त वाढवण्यात येईल." पाटोद्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही बसणार सीसीटीव्ही कॅमेरे शैक्षणिक वातावरण सुरक्षित व पारदर्शक व्हावे यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षण अधिकारी गांगुर्डे साहेब म्हणाले,पाटोदा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिक्षक-विद्यार्थी संबंध यामध्ये शिस्त व पारदर्शकता येण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल." संयुक्त समितीची स्थापना बैठकीत एक निर्णय घेण्यात आला की, नगरपंचायत, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग व शाळा-कॉलेज प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वेळोवेळी आढावा घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने सुधारणा सुचवेल. पालक व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा या सुरक्षाविषयक उपाययोजना राबवताना शहरातील नागरिक, पालक व तरुणांनी देखील सकारात्मक सहभाग द्यावा, असे आवाहन सर्व अधिकाऱ्यांनी व नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment