जिल्यातील सर्व मुख्याधिकारी यांच्या मनमानी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर तिव्र आंदोलन



बीड (प्रतिनिधी) नगर विकास विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगरपरिषद / नगरपंचायत यांचा मनमानी कारभाराच्या विरोधात व कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत रोजंदारी मजदुर सेनेच्या वतीने भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे, निदर्शने आंदोलन केले. बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद/नगरपंचायत कंत्राटी कामगारांची अनेक मूलभूत प्रश्न खोळंबली आहेत, त्यांची बेकायदेशीरपणे पिळवणूक सुरू आहे. या धोरणाविरुद्ध कामगार नेते तथा रोजंदारी मजदुर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी व जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनी नगरपरिषद/ नगरपंचायतीच्या अंदाधुंद कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त करत प्रचंड घोषणाबाजी करुन जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या दालनासमोर धरने धरुन बसल्यावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखालील बैठक सोडून सायंकाळी ०६:४५ वाजता जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड चे संभाजी वाघमारे यांनी आंदोलनाच्या शिष्टमंडळाला पाचारण केले. सविस्तर सखोल चर्चा केली. सर्वात अगोदर येणाऱ्या १० तारखेच्या आत थकीत वेतन कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करावे, कर्मचारी भविष्य निर्वा निधीचा युएनए नंबर देऊन मागील अनेक वर्षापासून कर्मचारी भविष्य निर्वीहनिधीची थकीत रक्कम कंत्राटी कामगारांच्या बँकेत जमा करावी, कंत्राट दाराने दर सहा महिन्यात कंत्राटी कामगारांना मास्क, हॅंडग्लोज, सेफ्टी शूज तात्काळ देण्यात यावेत, नगरपरिषद बीड आस्थापनेतील कंत्राटी कामगारांना अयोग्य व बेकायदेशीर रित्या कामावरून कमी केले त्यांना पगाराच्या व कामाच्या सलगतेसह पूर्ववत आठ दिवसात कामावर घेण्यात यावे, सरकारी कामगार अधिकारी बीड यांनी बीड जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत यांना उद्देशून लिहिलेल्या जा.क्र. १२१३/१२२८ दिनांक:- १७. १२. २०१९ पत्रात नमूद केलेल्या प्रपत्रात अहवाल येत्या आठ दिवसात मागून घेण्यात यावा, जर येत्या आठ दिवसांत कायदेशीर बाबींची पूर्तता केली नाही तर संबंधित मुख्याधिकारी यांच्या वर शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कडे सादर करण्यात यावा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड च्या वतीने मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हा सह आयुक्त संभाजी वाघमारे यांनी दिले, अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी