बीड शहर बचाव मंचाच्या वतीने कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी


बीड प्रतिनिधी- हरितक्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांची आज बीड शहर येथे संत भगवान बाबा चौक या ठिकाणी अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच श्रद्धा भावाने अभिवादन करून बीड शहर बचाव मंचाच्या व व कर्मयोगी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या अनुयायांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कृषी क्षेत्राशी निगडित कार्यावर मान्यवरांच्या वतीने प्रकाश टाकण्यात आला. त्यांनी हरितक्रांतीचे जनक म्हणून संपूर्ण जगात त्यांच्या कृषी व शेतकरी हिताच्या कार्यातून ओळख निर्माण केली. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र आज सुजलाम सुफलाम व स्वयंपूर्ण झाला आहे. त्यांची दूरदृष्टी हे महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे धोतक आहे. यावेळी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सर्व मान्यवरांनी वर्तमान तसेच पुढील काळामध्ये माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या विचारांवर वाटचाल करत त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राला कृषी व औद्योगिक विकासाच्या माध्यमातुन प्रगतीपथावर नेण्यात यशस्वी होऊ असा ठाम विश्वास व्यक्त केला. कृषी क्रांती जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने,डी.जी. तांदळे सर ,नितीन जायभाये, ॲड.अनिल बारगजे, मा.भूषण पवार, मीनाक्षी देवकते, लताताई राऊत, चित्रपट अभिनेते ॲड.महेश कुमार वनवे, बाजीराव ढाकणे, अमोल अंकुटे, काँग्रेस पक्षाचे गणेश बजगुडे, रामधन जमाले, गवते सर,अशोक लोढा,मयुरी ताई ढाकणे, जिव्हाळा बेघर केंद्राचे राजाभाऊ वंजारे, छायाताई सरोदे, अभिजीत वैद्य, बालाजी जगतकर,डॉ. संजय तांदळे,बंजारा क्रां. दल रा.म.सचिव शरद राठोड, कॅप्टन जे.डी चव्हाण, जि.प सभापती बाबुराव जाधव, विलास राठोड अंकुश राठोड, परमेश्वर जाधव, सरपंच भाऊसाहेब राठोड, शरद राठोड, प्रभाकर राठोड, राजेश राठोड, अभय चव्हाण, विजय चव्हाण, अशोक चव्हाण, प्रीत कुकडेजा,अशोक लोढा ,SDPI पार्टीचे आबिदभाई सय्यद, अशोक वाघमारे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी