सौ. के.एस.के. (काकू) कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांकडून खापरपांगरीत कृषी दिन साजरा; वृक्षारोपणाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
खापरपांगरी (ता. बीड) – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (के.एस.के.) कृषी महाविद्यालय, म्हसोबा फाटा, बीड येथील कृषीदूतांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गावात कृषी दिन साजरा करत एक आगळावेगळा उपक्रम राबवला.
या दिनाचे औचित्य साधून खापरपांगरी गावात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “एक मूल, एक झाड” ही संकल्पना घेऊन कार्यक्रम पार पडला. लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय खापरपांगरी येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला, तर गावातील शेतकरी बांधवांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमात ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचे कार्य गावातील मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी पार पडले. या कार्यक्रमासाठी सौ. मीरा बोत्रे (कृषी सहायक), सौ. वर्षा जोगदंड (ग्रामसेवक), सौ. अंजना राम माने (सरपंच) तसेच श्री. विक्रम अण्णा शेंडगे, मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय घोडके, व लोकमान्य टिळक विद्यालयातील शिक्षक वृंद यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन अनंत कृषी विकास प्रतिष्ठान संस्थेचे सहसचिव डॉ. जी. व्ही. साळुंके, प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. टी. शिंदे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. पी. ढोरमारे यांनी केले.
कार्यक्रमामध्ये कृषीदूत गणेश शिरसाट, विशाल शिंदे, माधव सानप, उजैर शेख, महावीर वाघमारे, निखिल वाघचौरे, वज्जा लक्ष्मण आदींचा सक्रिय सहभाग होता.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी एक सकारात्मक पाऊल असून, विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला.
Comments
Post a Comment