बीडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम
बीडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम
डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या पुढाकारातून अ.भा.म. नाट्य परिषद, के.एस.के. महाविद्यालयाचा उपक्रम
बीड (प्रतिनिधी)
दि.१ : ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंदाची रंगत निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बीड शाखा व सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू महाविद्यालयातील नाट्यशास्त्र व संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी बीडमध्ये येत्या दि.१७ जुलै रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बीड शाखा अध्यक्ष डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यामध्ये गीत गायन, नृत्य, नाटिका, काव्यवाचन, स्टँडअप कॉमेडी आदी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच तरुण वयात जोपासता न आलेले छंद साकार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी आपली नावे नोंदवावीत, त्यासाठी डॉ.दुष्यंत रामटेके ९७६७३५५२९४, डॉ.संजय पाटील देवळाणकर ९४२२२९५३१४, डॉ.राहुल सोनवणे ९८२२५७७६७१, डॉ.दीपक जमधाडे ८८८८८५०३५८, डॉ.अनिता शिंदे ७२७८३०५०५०, प्रा.विजय राख ९८३३३४५८०९, सुरेश थोरात ९४२२९११०९० यांच्याशी संपर्क करावा, असे संयोजकांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment