मोहित पढीयार यांचा अभिनव उपक्रम वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता वृध्दाश्रमातील आजी-आजोबांना अन्नदान करत आपला वाढदिवस साजरा केला
पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक मोहित पढीयार यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसा निमित्त एक अभिनव व सामाजिक दृष्टिकोन घेत आपल्या वाढदिवसा निमित्त त्यांनी हार,तुरे,बॅनर आणि इतर व्यर्थ खर्च टाळून,आपल्या वाढदिवसा
मोहितजींनी आपल्या मित्र परिवार सोबत वृध्दाश्रमास भेट दिली आणि आश्रमातील आजी- आजोबांना अन्नदान केले. त्यांच्या या मदतीमुळे आश्रमातील वृद्धांना आनंद आणि समाधान मिळाले.मोहित पढीयार यांचा हा निर्णय एक आदर्श ठेवणारा ठरला, कारण त्यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने आणि समाजातील वंचित व्यक्तींना मदत करून साजरा केला. यामुळे इतरांना देखील सामाजिक कार्यांमध्ये योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.
वृद्धांचे आशीर्वाद मिळवलेल्या मोहितजींना त्यांच्या या उपक्रमामुळे खूप प्रशंसा मिळाली. तसेच, आश्रमातील सर्व वृद्धांनी त्यांना आशीर्वाद देत उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची शुभेच्छा दिली. मोहित पढीयार यांच्या या उपक्रमामुळे त्यांनी समाजात एक सकारात्मक बदल घडवला आणि त्यांचा वाढदिवस खूपच यादगार बनला.
Comments
Post a Comment