टाकळी मानूर येथील शाहशरीफ बाबांची यात्रा अनुभवयांस मिळणं माझं भाग्य-डॉ.जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे टाकळी मानूर येथे शाह शरीफ बाबा यांच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक भक्त येथे जमा होतात ही यात्रा तीन दिवस चालते.नवस बोलला की तो पूर्णतवास जातो पूर्ण होतो अशी अख्याईका इथे आहे त्यामुळे आपल्या मनातील मन्नत इछया मागण्यासाठी हजारो भाविक यात्रेनिमित्त इथे येतात.तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात पहिल्या दिवशी बुधवार 02/04/2025 रोजी संदल, गुरुवार दिनांक 03/04/2025 रोजी सकाळी कावडी आगमन आणि स्वागत मिरवणूक आणि सायंकाळी छबीना व 04/04/2025 वार शुक्रवारी दुपारी कुस्त्यांचा हंगामा व रात्री गंगाजल अभिषेक असतो.या वेळेत पारंपारिक मिरवणून आताशबाजी, लाईट रोशनाई, तिखट-गोड जेवण, संदल, कुस्त्या आणि पाळणे व तमाशा या पण गोष्टी असतात. यात्रा मनोरंजन असून सत तम आणि रज गुणांची उधळण येथे पाहवयास मिळते. त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिम भाईचारा या यात्रेच मुख्य सूत्र असत गावातील सर्व जाती धर्माचे लोक यात्रेत सहभागी होतात. शाह शरीफ बाबा हे पावन पीर असून पूर्वीपासून बोललेले नवस इथे सत्यात ऊतरतात अशी अख्याईका आहे. याच पिराचा शाह शरीफ बाबा दर्गाचा प्रत्यक्ष संबंध छत्रपती घराण्याशी असून. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना अपत्य होत नसल्या कारनाणे याच शाह शरीफ बाबाला नवस केला होता आणि हा नवस सत्यात उताराला मालोजी राजेंना दोन पुत्र प्राप्त झाले त्यांनी नवस बोलल्या प्रमाणे पुत्राची नावे एकाच शहाजी राजे आणि एकाच शरीफ राजे असं ठेवण्यात आलं. हे दोन्ही नावे मुस्लिम असल्यासारखी भाषण्याचं एकमेव कारण म्हणजे हेच ते शाह शरीफ बाबा दर्गा देवस्थान होय.छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पहिली असता ती सुरु होते 1533 साली जन्मलेले बाबाजी भोसले यांच्यापासून. त्यांना दोन पुत्र एक मालोजी राजे आणि दुसरे विठोजी राजे त्यापैकी मालोजी राजे भोसले यांनी ह्याच शहा शरीफ बाबा च्या दरग्यात नवस बोलले आणि त्यांना दोन पुत्र झाल्याने नवस बोलल्या प्रमाणे त्यांची नावे शहाजी आणि शरीफजी असे नावे ठेवली. फार पूर्वीपासून नवस बोलला की तो पूर्ण होतोच अशी अख्याईका असणार पावन दर्गा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. ह्याच दरग्यात छत्रपती घराण्याकडून नगऱ्याची नौबत वाजविण्याची प्रथा इथे चालू केली पण ती काफीऱ्यांची नौबत का वाजवता ती काफीराची नौबत आहे ती बंद करा असं म्हणून औरंगजेबाने ती बंद पाडली आणि आणि शाह शरीफ बाबांनी औरंगजेबच्या स्वप्नात जाऊन तू माझी नौबत बंद केली मी तुझी बंद करतो असे म्हटले यावर औरंगजेबचा मृत्यू याच अहमदनगर येथे झाला. असंही येथील स्थानिक लोकांत बोललं जातं.आजही हा दर्गा अहमदनगर आणि आत्ताच अहिल्यानगर येथे आहे.अशी पावन दर्गा असल्या कारणाने येथील लोक वर्षातून एकदा इथे यात्रेनिमित्त दर्शनाला येतात. नारळ, उद, अगरबत्ती अर्पण करतात, कोणी श्रद्धाभावाने अन्नदान, गोड किंवा तिखट केले जाते. लांबून लांबून लोक इथे नवस बोलायला येतात त्यांना हा शाह शरीफ बाबा पावन होत असल्याने वेगवेगळी कारण इथे केले जातात. श्रद्धाभाव महत्वाचा आहे. लोक एकत्र येतात एक हिंदू मुस्लिम ऐकतेच प्रतीक म्हणून अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. येथे पिरसाहेबांच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे येथील ग्रामस्थ्यांच्या वतीन गोड जेवण मिठे चावलं देऊन अल्पउपहार देऊन केल जातं. अश्या पावन यात्रेनिमित्त आजचा हा प्रपंच. जय शाह शरीफ बाबा.... लेखन शब्दांकन
मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर
Comments
Post a Comment