लिंबागणेश येथे जगाला एकात्मतेची शिकवण देणारे संत कैकाडी महाराज यांची जयंती व रामनवमी उत्साहात साजरी

लिंबागणेश:- ( दि.०६) मानवानो माणुसकीला जागा हा महामंत्र देणारे राष्ट्रसंत,महान तपस्वी संत राजाराम महाराज म्हणजेच कैकाडी महाराज यांची जयंती आणि रामनवमी आज दि.०६ रविवार रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रभु रामचंद्र आणि कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित रमेश गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन हरिओम क्षीरसागर 
यांनी केले. डॉ.गणेश ढवळे यांनी आभार मानले.
          संत कैकाडी महाराज यांच्या जीवनकार्याची महती वर्णन करताना प्रा .लेनाजी गायकवाड यांनी " संत कैकाडी कैकाडी ! "दरारा आसमंती!! कुळ -विठुचे लावुन! खनिल्या विषमतेच्या भिंती!!
 कीर्तने ,प्रवचने, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन याद्वारे समाज प्रबोधन करून सर्व जगाला एकात्मतेची शिकवण देणारे महान तपस्वी कैकाडी महाराज यांचा जन्म राम नवमीला इ.स.१९०७ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण या गावी झाला. राष्ट्रसंत श्री कैकाडी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. तसेच ते कपडेही फार कमी वापरायचे. साधी राहणे व कधीही अन्न वाया जाऊ देत नसत. तसेच कोणालाही पाया पडू देत नसत " तुम्ही देव होऊ नका ,संत होऊ नका, तुम्ही फक्त माणस व्हा माणसं " हा संदेश ते समाजाला देत होते. "हे विश्वचि माझे घर "अशी भावना निर्माण झाल्याने त्यांनी समाज परिवर्तनासाठी स्वतःचा देह झिजवला. त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले त्यामुळे त्यांना कन्नड, तेलगू अशा भाषा येत होत्या. त्यांनी महाराष्ट्रासह अनेक प्रांतामध्ये जाऊन समाज प्रबोधन केले.पंढरपूर येथे मंदिर बांधण्यासाठी भाविकांकडून त्यांनी सहस्त्रकोटी नाम जप करून घेतला. कैकाडी मठ हे पंढरपूरचे आकर्षण आहे. भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन काळामधील या मठात भारत माता मंदिर आहे. या मंदिरामध्ये स्वर्गलोक ,पृथ्वीलोक आणि पातळ अशी या मठाची निर्मिती करण्यात आलेली आहे. माशाच्या तोंडाच्या तोंडासारखा मठाच्या प्रवेशद्वाराचा आकार तयार करण्यात आलेला आहे. विविध देवदैवतांच्या,संतांच्या, महापुरुषांच्या ,क्रांतिकारकांच्या मुर्त्या या ठिकाणी बसविण्यात आले आहेत.मठाचे सविस्तर वर्णन सांगितले. ह.भ.प.अनंतकाका मुळे यांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित प्रवचन केले.यावेळी राजेभाऊ गिरे, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, महादेव कुदळे, बाळकृष्ण थोरात,दादा गायकवाड, तुकाराम गायकवाड, संजय घोलप , अँड गणेश वाणी, संतोष भोसले, अंकुश गायकवाड, रामदास मुळे, श्रीराम वायभट, सुरेश ढवळे, सुरेश निर्मळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी