बेताल मंत्री माणिक कोकाटे यांना महाराष्ट्रा मधे फिरुन देणार नाही,शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड आजिनाथ खेडकर/शिवसेना तालुकाप्रमुख सोपानकाका मोरे
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुका येथे, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या प्रतिमेस जोडे मारले . शिरूर कासार तालुका येथे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांनविषयी गरळ ओकुण केलेल्या बेताल व अपमानास्पद वक्तव्याबद्दल शिरूर कासार तालुका शहरातील जिजामाता चौकामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ भाऊ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाप्रमुख सोपान काका मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदाधिकारी , शेतकरी बांधवांसोबत शिवसैनिक यांच्या वतीने माणिक कोकाटे यांच्या प्रतिमेस शेण फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले .
या प्रसंगी बोलताना उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुखांनी सांगितले की , महायुती शासनातील माणिक कोकाटे हा मंत्रीमंडळात ठेवण्यासाठी लायक नसुन वारंवार शेतकऱ्यांन बदधल बेताल वक्तव्य करित आहे, यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांनची अवहेलना होत असुन त्याला ताबडतोब बडतर्फ केले पाहिजे , यापूढे कोकाटेनी असशी बेताल बडबड केल्यास शिवसैनिक त्याला फिरु देणार नाहीत , असा इशारा या प्रसंगी देण्यात आला .
यावेळी लालाभाई पठाण .राजेश कोकणे.संजय सानप.युवा सेनेचे तालुकाप्रमुख साईनाथ ढाकणे कलिम शेख.नामदेव आघाव सांरग बडे.संतोष केदार.यांच्यासह शिवसैनिक , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Comments
Post a Comment