शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मानसोपचारासाठी येरवड्याला पाठवा ; वैद्यकीय उपचारासाठी मदतनिधी अजितदादांना पाठवणार :- डॉ.गणेश ढवळे



लिंबागणेश:- ( दि.०६ ) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांबाबत वारंवार वादग्रस्त विधान करत असुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन शेतक-यांना दिली जाणारी कर्जमाफी स्वतःच्या खिशातून देणार आहेत का?? त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन त्यांना मानसोपचारासाठी पुणे येथील येरवडा याठिकाणी भरती करण्यात यावे अशी मागणी करत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील शेतकऱ्यांनी उपचारासाठी लागणारा वैद्यकीय मदतनिधी गोळा करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवणार असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठीमागे हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही.आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रूपयात पिक विमा योजना लागू केली आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते याविषयी शेतकऱ्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे फळबागांची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचे आणि ५ ते १० वर्षं कर्जमाफी व्हायची वाट पहायची.तोपर्यंत कर्ज भरायचे नाही . तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात.त्या पैशाचं तुम्ही काय करता? त्या पैशातून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? शेतकरी म्हणतात की कर्जमाफी करा आणि त्यातुन साखरपुडे,लग्न करतात. या असंवेदनशील वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असुन कृषीमंत्री कर्जमाफी स्वतःच्या खिशातून करतात का? वारंवार शेतकऱ्यांविषयी बरळत असतात.त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असुन त्यांना येरवड्याला भरती करा. वैद्यकीय उपचारासाठी आम्ही निधी गोळा करू असे म्हणण तिव्र संताप व्यक्त केला आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी