युवासेनेचा युवाविजय मराठवाडा दौऱ्याचा चौथा टप्पा जालना येथे जल्लोषात संपन्न
राज्यमंत्री योगेशजी कदम यांनी आपल्या दौऱ्याप्रसंगी मराठवाड्यातील युवा सेनेचे उल्हेखनीय काम पाहून त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. व इतर कार्यकर्त्यांनी मराठावाड्यातील युवासेनेच्या कार्याची प्रेरणा घ्यावी. असे कौतुकातून बोलून दाखवले आहे.
बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, युवासेना मार्गदर्शक व लोकसभा सदस्य मा. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली युवा सेनेचा युवाविजय मराठवाडा दौऱ्याचा चौथा टप्पा जालना येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या भव्य दौऱ्याला महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (गृह-शहरी, महसूल-ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग ) मा. योगेशजी कदम साहेब,माजी मंत्री व जालना विधानसभा सदस्य मा.अर्जुन खोतकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेशजी सरनाईक,युवासेना सचिव किरणजी साळी, यवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा होता. राज्यमंत्री मा.योगेशजी कदम साहेब यांनी युवासेनेच्या दौऱ्यातील कार्यपद्धती,पारदर्शक नियोजन आणि संघटना वाढीसाठी चालवलेल्या मेहनतीचे मनःपूर्वक कौतुक केले. याप्रसंगी जालना जिल्ह्यातील अनेक युवानेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये जालना जिह्यातील युवासैनिकांचे प्रबळ नेतृत्व युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य अभिमन्यू खोतकर,युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे,मराठवाडा निरीक्षक बाजीराव (दादा) चव्हाण, युवतीसेना मराठवाडा निरीक्षका आकांक्षा चौगुले,युवासेना निरीक्षक आविनाश जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख जालना अजय कदम व युवासेना जिल्हाप्रमुख जालना अमोल ठाकुर,युवासेना उपजिल्हाप्रमुख जालना गणेश मोहीते तसेच मोठ्या संख्येने युवासैनिक उपस्थित होते. युवासेनेच्या या दौऱ्याने मराठवाड्यातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून संघटना अधिक बळकट करण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. हे या अभूतपूर्व मेळाव्यातून दिसून आले आहे.
Comments
Post a Comment