लोकशाही पत्रकार संघाचा सतीशदादा दरेकर यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर



पुणे प्रतिनिधी
पुणे येथील सतीशदादा दरेकर संस्थापक अध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संस्था यांना लोकशाही पत्रकार संघाचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश सतीशदादा यांनी कुंभार समाज सामाजिक संस्थेची स्थापना २७जानेवारी २०२०रोजी आपल्या सहकारी पदाधिकारी यांना घेऊन घटनेप्रमाणे नोंदणी केली, सुरुवातीला २४ आघाडी करून त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सरचिटणीस संघटक पदे निर्माण करून प्रत्येक आघाडीला स्वतंत्र अधिकार देऊन समाज्याला उपयोग होईल अशी रचना केली. 
 महाराष्ट्रातील ३६जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष यांना नियुक्त केले,त्यानंतर कोरोना काळ चालू झाला आणि दादांनी घरून जेव्हडी मदत होईल तेव्हडी केली. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत असो, कोकणातील बांधवाना मदत असो सर्वकाही केले, महाराष्ट्रात दौरे करून समाज बांधवांचे प्रश्न सोडवणे,वधू वर मेळावा, कुंभार मंगलम वेबसाईटचे आणि जनगणना अँपचे उदघाटन वधू वर मेळाव्यात करण्यात आले त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले,तेर येथे जाऊन संत शिरोमणी श्री गोरोबा काका यांचे चरणी नतमस्तक होऊन समाज्याला एकत्र करून कार्यक्रम करणे,अन्याय झाला असेल तेथे जाऊन समक्ष सोडवून न्याय देणे, अश्या घटना आपल्या समाज बांधवाबाबत झाल्या. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व हे अंगी गुण असून रात्रंदिवस समाज्यासाठी झटत असतात.. सुख दुःखामध्ये उपस्थित राहतात, वीट व्यवसाय रॉयल्टी, POP बाबत प्रश्न असो, गाडगी मडकी प्रश्न असो दादांनी शासन दरबारी समाज बांधवांचे प्रश्न सोडवणे साठी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, इतर खात्याचे मंत्री यांना भेटून दहा ठराव करून पाठपुरावा चालू आहे. पदाधिकारी यांना योग्य पदे देऊन सन्मान केला,अशीच एक आठवण कै. विष्णूशेठ पाषाणकर यांच्या श्रद्धांजली कार्यकामावेळी दादांना अश्रू अनावर झाले आपल्या जवळचा सहकारी गेल्याचे दुःख फार मोठे आहे असे संवेदनशील दादा पाहायला मिळाले. इतके प्रेम आपल्या समाज बांधवावर करणारे अशी बरीच उदाहरणे आहेत. नुकत्याच शिर्डी येथील झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये सन्माननीय श्री. रमाकांत क्षीरसागर साहेब यांची प्रदेश अध्यक्ष कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती केली असून नवीन पदाधिकारी यांना संधी देण्यात आली.या त्यांच्या कार्याची दाखल घेऊन लोकशाही पत्रकार संघाने त्यांनाराज्यस्त्रीय समाजरत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे.सतीश दरेकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर
लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सतीश दरेकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.. या राज्यस्तरीय लोकरत्न, समाजरत्न, आदर्श पुरस्कार सोहळ्यास राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते संभाजीनगर येथील श्री संत एकनाथ रंगमंदिर येथे करण्याचे आयोजित केले आहे. 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी माननीय महामहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे , राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. संजयजी शिरसाठ, कॅबीनेटमंत्री अतुलजी सावे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,
मा. पालकमंत्री तथा मंत्री खासदार सांदिपानजी भुमरे पाटील, माजी खा. इम्तियाज जलील, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रशांत बंब,राष्ट्र संत रामगिरीजी महाराज, मराठवाड्यातील आय ए. एस./ आय पी एस अधिकारी यांचीही उपस्थिती राहणार आहे. पुरस्काराचे पत्र देताना सं. अ. लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य चे बीबी वैद्य,संध्या सुधीर सरोदे उद्योग विकास समिती महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष परळी वैद्यनाथ,उपाध्यक्ष शिरूर- आंबेगाव विधानसभा मनसे, प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विकास समितीचे शुभांगी पाटील, बाळासाहेब कुंभार प्रदेश सहसचिव सुनील महाकुंडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिस कुरेशी आदी दिसत असून सतीश दरेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतं आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी