शेख निजामच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे ताकतीशी पाठीशी राहील- -उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
बीड प्रतिनिधी :-बीड जिल्ह्यातील व शहरातील प्रगल्भ आणि अचूक राजकीय निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या शेख निजाम यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला व त्यानिमित्ताने शेख निजाम यांचा पक्षप्रवेश व रमजान ईद निमित्त ईद-ए-मिलाप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पक्षप्रवेश व ईद-ए-मिलाप च्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अजित दादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रस्ताविक पर भाषणामध्ये शेख निजाम यांनी बीड शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या नवीन ईदगाह बालेपिर येथे सिमेंट काँक्रेट रस्ता व काँक्रिटीकरण, अल्पसंख्याक समाजातील मुलींकरिता मंजूर असलेले वस्तीग्रह च काम सुरू करणे, बीड जिल्ह्यात उर्दू घराची स्थापना करणे, इतर जिल्ह्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील यूपीएसस एमपीएससीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक मुला मुलीं करिता स्टडी सेंटर व लायब्ररी स्थापित करणे, इस्लामपुरा ईदगाह येथे जागा अपुरी पडत असल्यामुळे बिंदुसरा नदी पात्रातील जागा उपलब्ध करून देणे, अल्पसंख्यांक बहुल भागात नियोजनबद्ध आराखडा तयार करून सदरील भागांचा नियोजनबद्ध विकास करणे आधी मागण्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या कडे केल्या या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेख निजाम हे महत्त्वकांक्षी व्यक्तिमत्व असून त्यांनी केलेल्या मागण्या चा सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्यात येतील त्याचा पाठपुरावा शेख निजाम यांनी करावा व या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल एक निजाम व सहकार चे अभिनंदन करीत शेख निजाम सारख्या कार्यकर्त्यांची पक्षाला गरज असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेख निजाम यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकतीशी उभी राहील असे म्हटले सदरील कार्यक्रमास मा आ. प्रकाश दादा सोळंके, मा. आ. अमरसिंह जी पंडित, आ. विजयसिंह पंडित, आ. सतीश जी चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी आ. संजय दौंड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण अँड गोरक्ष लोखंडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, योगेश क्षीरसागर, नारायण बप्पा शिंदे बळीराम गवते, बळी चव्हाण, प्रशिक्षित जाधव, अनुप मंत्री, संदीप पाटील, रितेश ढगे पाटील गोपाल धांडे, विजय चांदणे, सलीम शेख, समीर सय्यद, रईस चाऊस, सरपंच बिलाल पटेल, प्रज्ञाताई खोसरे, प्रियाताई डोईफोडे, शितलताई धोंडरे,लोकपत्रकार भागवत तावरे, अब्दुल वकील सर अस्लम अनवरी सर, नगरसेवक जैतुला खान, शेख इकबाल, रवीद्र कदम विनोद मुळूक, विलास विधाते, रमेश चव्हाण, सय्यद इलियास मुन्ना, इनामदार, रफिक नाशाद,यांच्या सह बीड शहरातील अनेक नगरसेवक मान्यवर व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आदी उपस्थित होते
प्रवेश झालेल्या लोकांची नावे
शेख निजाम जैनुद्दीन ,शेख अमर जैनुद्दीन, मोमीन जुबेर ,खय्युम इनामदार, पठाण चुन्नू खान, जयंत वाघ ,आजम खान, जब्बार इनामदार ,मुजफ्फर चौधरी ,शेख, नसीर, हाजी अयुब खान पठाण ,शेख हमीद पीर मोहम्मद ,सय्यद फहीम, शेख इमरान शेख अदनान जमीर इनामदार सय्यद रियाज राजे व इतर
Comments
Post a Comment