आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार ‘संघर्ष दिन’ साजरा,राज्यात लॉंग मार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे सरांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम



लॉगमार्च प्रणेते, भीमसैनिकांचे सरसेनापती, आंबेडकरी आंदोलनातील क्रांतियोद्धा, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवारी 1 एप्रिल 2025 रोजी रिपब्लिकन ब्रदरहूड (भाईचारा) अभियानाअंतर्गत पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युवक आघाडी, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेना तसेच पीपल्स फाऊंडेशनतर्फे संपूर्ण राज्यात ‘संघर्ष दिन’ साजरा केला जाणार आहे. नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, अकोला, बुलढाणासह राज्यातील विविध शहरातील निःशुल्क अ‍ॅक्सीडेंट इन्शुरन्स पॉलिसी वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान, अनाथालय-रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीरिपा प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

नागपुरातील आनंद नगरात मुख्य सोहळा

देशातील आंबेडकरी, बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी, वंचित घटकातील युवकांमध्ये संघर्षरुपी स्फूर्ती व एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना संविधानाच्या संरक्षणार्थ लढण्यास प्रेरित करणारे प्रा. जोगेंद्र कवाडे सर हे 82 व्या वर्षात पदापर्ण करणार आहेत. देशभरात पीरिपा ‘संघर्ष दिन’ म्हणून साजरा करणार असल्याचेही कपील लिंगायत यांनी सांगितले. नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्यालयात मंगळवारी सायंकाळी 5 वाजता भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ व जिल्हयातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहतील. पीपल्स रिपब्लिकन पार्टी मुख्यालय येथे मंगळवारी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाला पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल लिंगायत, मृणाल गोस्वामी, कैलाश बोंबले, विजय पाटिल, अजय चव्हाण, नरेंद्र डोंगरे, पलाश ठवरे, रत्नाकर मडके, अरुण वाहणे, सविताताई नारनवरे, प्रा. रंजनाताई कवाडे, प्रतिमाताई कवाडे, सुनीताताई शेंडे, सुचिता कोटांगळे, संजय खांडेकर, प्रा. गोपीचंद ढोके, दिलीप पाटील, सोहेल खान, स्वप्नील महल्ले, प्रकाश मेश्राम, शैलेंद्र (बापू) भोंगाडे, मुरलीधर मूरारकर, हिमांशू मेंढे, संजय बडोदेकर, सुमित डोंगरे, भीमराव कळमकर, प्रज्योत कांबळे, स्वप्नील वाडीभस्मे, अंकित ठवरे, कौस्तुभ चौधरी आणि समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत. 
                                                                                                         

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी