छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी महामानव सार्वजनिक वाचनालय येथे विनम्र अभिवादन.
बीड प्रतिनिधी - कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या स्मृतिदिनी महामानव अभिवादन ग्रुप तर्फे महामानव सार्वजनिक वाचनालय धानोरा रोड बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष अनिल डोंगरे अध्यक्ष म्हणून तर राणोजी उजगरे महासचिव वंचित बहुजन आघाडी धारूर चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पदीप धुपाने पूजन करून पुष्प माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महामानवा अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले, महामानव वाचनालयाचे उपाध्यक्ष डी.जी वानखेडे व प्रा. अशोक गायकवाड,ॲड.तेजस वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम राऊत यांनी तर प्रस्ताविक अर्जुन जवंजाळ यांनी केले.अनिल डोंगरे यांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातून सुराज्य कसे निर्माण केले व त्यांच्या राज्यकारभाराची नीती तसेच राज्यकारभाराची, शेतकरी,स्त्री व जमीन सुधारण्या करिता व जलनीती करता अमल बजावणी व सर्व समावेशक अठरापगड मावळ्यांना एकत्रित करून राज्यकारभार कसा केला याबद्दल सविस्तर माहिती दिली. महाराजांची राजनीती संपूर्ण जगात आज कशी मार्गदर्शक आहे याबद्दल अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करून त्यांच्या जीवनकार्यातून प्रत्येकाला जीवन जगण्याकरता प्रेरणा मिळते हे आवर्जून स्पष्टपणे सांगितले. या कार्यक्रमास आर्वीचे माजी सरपंच लक्ष्मण जोगदंड,अविनाश डोळस, सुधाकर विद्यागर , बि.डी तांगडे,प्रशांत वासनिक व वाचनालयाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment