रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत पाटोदा शहरात 210 घरकुल मंजूर करून आणल्याबद्दल कार्यसम्राट विकासभू आमदार सुरेश आण्णा धस यांचे चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर आभार - प्रा.लक्ष्मण वाघमारे



पाटोदा (प्रतिनिधी) रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत पाटोदा शहरात 210 घरकुल मंजूर करून आणल्याबद्दल चर्मकार समाजाच्या वतीने कार्यसम्राट विकासभू आमदार सुरेश आण्णा धस यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.
पाटोदा शहरात मागील काही काळापासून घरकुलांची गंभीर आवश्यकता होती.ही बाब आमदार सुरेश आण्णा धस यांनी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या मदतीने पाटोदा नगरपंचायत अंतर्गत 210 घरकुलांची मंजुरी मिळवून दिली असल्याने पाटोदा शहरातील गरजू आणि गरिबांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लागल्याने पाटोदा शहरातील चर्मकार समाजाच्या वतीने प्रा. लक्ष्मण वाघमारे यांनी आमदार सुरेश आण्णा धस यांचे आभार व्यक्त करत म्हटले की, "आमदार सुरेश धस यांच्या अथक परिश्रमामुळे आज पाटोदा शहरातील चर्मकार समाजासह इतर समाजातील अनेक कुटुंबांना एक छत मिळवण्याची संधी मिळाली आहे. यामुळे समाजातील अनेक कुटुंबांची जीवनमान सुधारेल."प्रा. लक्ष्मण वाघमारे यांनी यावेळी बोलताना म्हणाले "आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा नगरपंचायत नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव तसेच उपाध्यक्ष, सभापती सर्व नगरसेवक पाटोदा शहराच्या विकासासाठी नेहमीच कार्य करत आहे आणि हे घरकुल प्रकल्प देखील त्यांचाच एक भाग आहे. त्यांच्यामुळेच पाटोदा शहरातील चर्मकार समाजाला एका उज्जवल भविष्याची आशा निर्माण झाली आहे." असे देखील सांगितले असुन रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत पाटोदा शहरात 210 हेवढे मोठे घरकुल मंजूर करून आणल्याबद्दल कार्यसम्राट विकासभू आमदार सुरेश आण्णा धस यांचे चर्मकार समाजाच्या वतीने जाहीर आभार प्रा.लक्ष्मण वाघमारे यांनी मानले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी