मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश कदम यांची निवड
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, शासकीय व प्रसिद्धी पासून कोसो दूर असलेल्या वंचित घटकाला न्याय देण्याचे काम करत असून , दैनिक लोकमत, मराठवाडा साथी या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहेत, आणि आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या माध्यमातून सामाजिक जोपासना करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अविनाश कदम यांच्या कामाची दखल मराठी पत्रकार परिषदेने घेतली असून पुन्हा बीड जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे यांनी बीड येथे ८ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहात झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा पदाधिकारी यांच्या बैठकीत सत्कार करून व नियुक्तीपत्र देऊन निवड केली . अविनाश कदम यांच्या निवडीबद्दल युवा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष निसार शेख,सचिव जावेद पठाण,कार्याध्यक्ष अक्षय विधाते, कार्यवाहक गहिनीनाथ पाचबैल,अतुल जवणे, संघटक समीर शेख, प्रेम पवळ, सहसचि...