पाझर तलावासाठी संपादीत जमिनीवर पवनचक्कीचे उपकेंद्र कारवाईस टाळाटाळ आणि मावेजा मागणा-या शेतकऱ्यांला दिवसभर पोलिसांनी डांबुन ठेवले

पाझर तलावासाठी संपादीत जमिनीवर पवनचक्कीचे उपकेंद्र कारवाईस टाळाटाळ आणि मावेजा मागणा-या शेतकऱ्यांला दिवसभर पोलिसांनी डांबुन ठेवले ; पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील धक्कादायक प्रकार :- डॉ.गणेश ढवळे 
पाटोदा:- ( दि.०८) पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथे पाझर तलाव क्रमांक ७ साठी सर्व्हे गट नंबर ८ मधील संपादीत केलेल्या जमिनीवर पवनचक्की द्वारे निर्मित वीजेसाठी जवळपास ५ कोटी रुपये खर्चून सरकारी जमिनीवर २२० केव्ही चे उपकेंद्र रेन्यु पावर कंपनीने बांधण्यात आले आहे.प्रशासकीय आणि राजकीय हस्तक्षेपामुळे या फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यास पोलिस प्रशासन टाळाटाळ करत आहे.मात्र याचवेळी दुसरीकडे पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील शेतकरी बापु बंकट आर्सुळ आणि मयुर भाऊसाहेब झोडगे यांनी त्यांच्या गट क्रमांक ४५ मधील शेताचा मोबदला न देताच शेतातुन तार ओढण्याचे काम करणाऱ्या कंपनीला काम करू नका अशी विनंती करताच पवनचक्की कंपनीच्या सांगण्यावरून पाटोदा पोलिस प्रशासनाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत का? संबंधित शेतकऱ्याला कंपनीने मोबदला दिला आहे का याची खातरजमा न करताच दमदाटी करत पोलिस गाडीत घालून पाटोदा पोलिस ठाण्यात दिवसभर डांबुन ठेवले आणि रात्री पोलिस संरक्षणात काम सुरुच होते. यामुळे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पवन ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणी कामांना पोलिस संरक्षण दिले जात असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत अथवा करार किंवा कायदेशीर दस्तावेज कंपनीकडे आहेत का? शेतक-याला मोबदला मिळाला आहे का? शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत का?? याची शहानिशा न करताच पोलिस बळावर शेतकऱ्यांवर अन्याय होत असुन शेतक-यांना वाली कोण?? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.

पत्रकाराला वार्तांकन करण्यास मज्जाव ; पोलिसांची भुमिका संशयास्पद :- मुस्तफा पठाण पत्रकार 
---
पोलिस प्रशासनाने पवनचक्की कंपन्यांना संरक्षण देऊ नये अशी भुमिका कोणीच घेणार नाही.मातृर पोलिस प्रशासनाने पवनचक्की कंपन्यांकडून उचल घेतल्यागत पवनचक्की कंपनीचे हस्तक असल्यासारखे वागु नये.शेतक-यांना मोबादला न देताच काम पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडुन सहकार्य होत असेल तर शेतकऱ्यांवर होणा-या अन्यायाला कोण संरक्षण देणार? मी स्वतः पत्रकार असुन माझे ओळखपत्र दाखवून सुद्धा पोलिसांनी वार्तांकन करण्यास मज्जाव केला. पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असुन संबंधित प्रकरणात पोलिस अधीक्षक बीड नवनित कांवत यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे पत्रकार तथा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ सक्रिय प्रचारक बीड तालुका मुस्तफा पठाण यांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाला हाताशी धरून पवनचक्की कंपन्यांची मोगलाई सुरू :- बाळासाहेब मोरे पाटील ( प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच)
----
पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पवनचक्की कंपन्यांच्या आधिका-यांकडून पोलिस प्रशासनाला हाताशी धरुन मोगलाई सुरू असुन दडपशाहीचा अवलंब करत असुन अशिक्षित अडाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत कायद्याची भिती दाखवून शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे.पाटोदा पोलिस स्टेशनच्या आधिका-यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नसताना कोणतीही शहानिशा न करता विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. पवनचक्की कंपन्यांच्या दडपशाही आणि पोलिस प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे बाळासाहेब मोरे पाटील प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच यांनी सांगितले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी