आज स्त्री होऊ या .....!!!


आज ८ मार्च जागतिक महिला दिनाला हे वाचून काहीसे आश्चर्य वाटेल पण हा मुद्दा नीट समजून घ्यावा। रजनिश म्हणतात "करुणा, प्रेम, अहिंसा, सेवा हे स्त्रीत्वाचे गुणविशेष आहेत. आणि हिंसा ,कठोरता, हे सारे पुरुषी गुण आहेत. या दोन्ही प्रकारच्या गुणांचा स्त्री किंवा पुरुषांच्या शरीराशी काहीही संबंध नाही. हे गुण दोन्हीही प्रकारच्या व्यक्तीत असू शकतात. दोन्ही प्रकारचे गुण एकाच व्यक्तींत सुध्दा असू शकतात पण जे गुण जास्त प्रभावी असतील ती व्यक्ती त्या प्रकारची समजावी. म्हणजे एखाद्या स्त्रीमध्ये कठोरता असेल तर ती पुरुषप्रधान गुणांची आहे आणि एखादा पुरुष स्त्री गुण असलेला आहे तर त्या व्यक्तीला स्त्रीप्रधान गुणांचा मानावा. ( येथे परत एकदा सांगते की करुणा, प्रेम, अहिंसा, सेवा हे गुण म्हणजेच स्त्रीत्वाचा आविष्कार आणि हिंसा व कठोरता म्हणजेच पुरुषत्व हे लक्षात आले की हे का लिहिले आहे हे लवकरच कळेल )
इतके थेट स्पष्ट केल्यावर रजनिश बुद्धांचे उदाहरण देतात ते म्हणतात की बुद्धांचा प्रवास हा पुरुष मूल्यांकडून स्त्री मूल्यांकडे होतो आहे. राजा अशोकाचा प्रवास हा त्याच प्रकारचा आहे. त्यामुळे स्त्री मूल्ये ही मानवतावादी मूल्ये आहेत आणि तीच आध्यात्मिक मूल्ये आहेत. आपल्यातील मनुष्यत्वाला ती उन्नत करणारी मूल्ये आहेत. ते उदाहरण देतात की राम, कृष्ण, महावीर ,बुद्ध यांची चित्र पुरुष असूनही दाढी मिशा नसलेली काढली जातात किंबहुना स्त्रीप्रधान सुंदरतेने काढली जातात याचे कारण त्या व्यक्तीचा प्रवास हा स्त्री प्रधानतेकडे झालेला आहे हे दाखविले जाते. म्हणून हिंसा करणारा योद्धा हा दाढी मिशा असलेला आणि संत हा स्त्री चेहर्यातच दाखविण्यामागे ही मूल्यांची वाटणी आहे.
  महाराष्ट्रात ‘ ज्ञानेश्वर माऊली ’ हा शब्दप्रयोग कुणाला खटकत नाही आणि एका पुरुषाला माऊली का म्हटले जाते याचे उत्तर मिळते आणि ज्ञांनेश्वरांचे चित्र हे मिशा दाढी नसलेले व सुंदर का दाखविले जाते याचे उत्तर मिळेल. साने गुरुजींना महाराष्ट्राची माऊली म्हटले जाते ते यामुळेच. साने गुरुजी यांचे व्यक्तिमत्व रजनिश म्हणतात त्याप्रकारचे आहे व आंदोलनात ते पुरूष गुण ही व्यक्त करीत 
अमृता प्रीतम आणि इमरोज नात्यात इमरोज ची जास्त चर्चा होते याचे कारण इमरोज याने ही स्त्री प्रधान गुण खूप उत्कृटतेने आत्मसात केले आहेत आणि स्वामित्व भावना या पुरुषी गुणाच्या वर उठून स्त्रीप्रधान समर्पणाची आणि प्रेमाची चरणसीमा गाठून दाखवली आहे त्यामुळे आपण सारे कोमल होऊ या। स्त्री गुण आत्मसात करू या 
एवढेच जर या महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात आले तर आज सुरू असलेल्या कुटुंबातील व समाजातील अनेक समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल म्हणून आपण महाराष्ट्र राज्यातील सर्वचजण आज संकल्प करुया आणि आपल्या समस्या आपणच सोडवुया
 हिच आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करते 
सौ. आशाताई बाजीराव ढाकणे
सचिव
श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जोला पो देवगाव ता केज जि बीड

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी