जागतिक महिला दिना निमित्त सावता सेनेच्या वतीने पाटोद्यात स्वाती कातखडे यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन


पाटोदा (प्रतिनिधी)जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्त सावता सेना महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षा सौ स्वाती दत्ता कातखडे यांच्या वतीने पाटोद्यात अनाथ शालेय विद्यार्थिना कपडे वाटप तर महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच वृक्ष लागवड, करून होतकरू दिव्यांग महिलांचा सन्मान करून पाटोद्यात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आयोजन सावता सेना महिला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्षा स्वाती कातखडे यांच्या वतीने करण्यात आले आहे‌. पहिले शहरातील उच्चभ्रू महिला वर्गातच महिला दिन संपन्न व्हायचा मात्र सावता सेना महिला आघाडीची टीम महाराष्ट्र राज्यभर सक्रिय झाल्या पासून हे चित्र बदलले पाहिला मिळत आहे. सावता सेना महिला आघाडीच्या वतीने राज्यभर विविध सामाजिक उपक्रम घेऊन महिला दिवस साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही सावता सेना बीड जिल्हाध्यक्षा स्वाती कातखडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातील तळागाळात जाऊन काम करित असल्यामुळे महिला आपल्या वाटा पकडु लागल्या आहेत जिल्ह्यातील महिला कोणी शिक्षण,आरोग्य,बचतगट यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात महिला काम करुन मोठ्या प्रमाणात बळ मिळू लागल्या आहे.आता बीड जिल्ह्यातील महिला आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांनी नव्या वाटा तुडवायला सुरूवात केल्या असुन ही फार सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन सावता सेनेच्या महिला आघाडी बीड जिल्हाध्यक्षा स्वाती कातखडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी