अनेकांच्या जीवनात योग्य शैक्षणिक मार्गदर्शन देऊन अमूलाग्र बदल घडवणारा अवलिया पीएसआय अनिल परजने सर
शेकडो पोरांचं भलं करणारा महान शिक्षक, भरतीची आवड लावणारा ग्रेट पोलीस अधिकारी, अनेक नौकर्यांना लाथाडून स्वपणातील नौकरी करायला बेसब्र वाट पाहुन ती मोठ्या मेहनतीने,कष्टाने हासील करणारा महान विद्यार्थी, आपल्या ज्ञानाने इतरांना प्रकाशित करणारा अवलिया, अनेक विद्यार्थ्यांचे भलं करून कोणी पोलीस कोणी फौजी कोणी डॉक्टर कोणी शिक्षक तर कोणी मोठमोठ्या पदावर विराजमान करण्यासाठी आपल्या ज्ञानाची पराकष्टा लावणारे ग्रेट शिक्षक म्हणजे खालापूरी गावाचे भूमिपुत्र सन्माननीय स्वर्गीय अनिल परजने सर होय. माझ्या जीवनात अवघड विषय इंग्रजी अगदी सुकर करून आम्हाला इंग्रजी व्यकरणाचे धडे देऊन इंग्रजी ची कायमची भीती घालवणारे शिक्षक म्हणजे अनिल परजने सर त्यामुळे मी सायन्स ला गेलो आणि आज डॉक्टर झालो असे मत डॉ जितीनदादा वंजारे यांनी व्यक्त केले.
स्वर्गीय अनिल सर नौकरी लागण्या आधी खालापूरी गावात कलास घ्यायचे,आम्ही त्यांची पहिली बॅच आणि मी त्याचा आवडता विद्यार्थी.इंग्रजी चा प्रश्न आणि माझे हजर उत्तर हे एक अनोख सूत्र असायच, जितीन तू मोठ्या पदावर जाशील तू घाई गडबड करत जाऊ नको, आयुष्यात निर्णय महत्वाचा असतो तो विचारपूर्वकच घेतला पाहिजे, आयुष्य हे एक जंग आहे सतर्क रहा, रिकामं मन हे सैतानाच घर असत त्यामुळे स्वतःला सतत कश्यात ना कश्यात गुंतवून ठेवायचं असं सर आम्हाला नेहमी सांगायचे.खरोखर सर तुम्ही ग्रेट होतात.तुमच्या मरण्यावर आणि आमच्यातून निघून जाण्यावर किमान माझा तरी विश्वास नाही. हजारो विद्यार्थी हिम्मतीने घडवणारा ढाण्या वाघ गोळी घालून आत्महत्या करतो ह्या बातमीवर माझा अजिबात विश्वास नाही. सर तुम्हाला आम्ही जवळून पाहिलं आहे अनुभवलं आहे तुम्ही महान पुत्र, महान मित्र,महान शिक्षक, महान पालक आणि महान समाजहीत जपणारा अधिकारी होतात असं अचानक जाण्याजोग काहीच नव्हतं पण झालं ते झालं सर तुम्ही गेल्यामुळे आम्हाला तुमच्या ज्ञानाची पोकळी आणि मार्गदर्शनाचा पाठीराखा हात नसल्याचं नेहमी जाणवतय.
पी एस आय अनिल परजने सर तुमचा बंदोबस्त किंवा तुमचं काहीतरी काम सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे होत,त्याकाळी मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा कोषध्यक्ष होतो माझा कार्यकर्ताचा लवाजमा,तेथील मोठमोठी नेते मंडळी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तेथे आले होते तुमचा बंदोबस्त तिथेच होता आणि तुमचा विद्यार्थी त्यातला एक हे तुम्हाला अभिनास्पद होत त्यात तुम्ही जितीन खूप मोठा झालास डॉ झालास आणि नेताही झालास जितीन तू नाव कमावलस हे बोललेले शब्द नक्कीच दहा हत्तीचे बळ देऊन गेले.तुम्ही पीएसआय झाल्यावर तुमचा ह्याच तुमचा विध्यार्थी डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर त्या काळचा एन सी पी एस सी सेल चा जिल्हाध्यक्ष या नात्याने गावात भव्य दिव्य नागरी सत्कार केला होता. त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष ऍड शेख शफिक, मराठवाडा छावा चे सर्वेसर्वा संस्थापक गंगाधरनाना काळकुटे, जनसेवा ग्रुप चे अध्यक्ष डॉ रमेश शिंदे यांच्यासह अनेक नेते मान्यवर कार्यक्रमाला होते.सत्कार समारंभाला खूप विद्यार्थी पालक आले होते. तुमच्या प्रेरणादाई विचाराने भारावून आजही प्रत्येक भरतीत चार पाच तरी पोरं लागतात ह्याच श्रेय तुम्हालाच जातंय सर.कर्तबगार नौकरीला भरतीला लागलेल्या मुलांचे गावात सत्कार झाले पाहिजेत ही संस्कृती मीच खालापूरी गावात राबवली याचा मला अभिमान आहे. त्याची सुरुवात तुमच्यापासून झाली. नंतर पिएसआय महारुद्र परजने सर यांचाही भव्य सत्कार मी गावात वट्यावर ठेवला होता अनेक युवा ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे इतर लहान मुलांना त्याची प्रेरणा भेटून तेही असेच मोठे व्हावेत हीच त्यामागचा माझा मानस होता.एकंदरीत समाजाप्रती भावना आस्था असणाऱ्या लोकांची गावात स्मारके होतात, तुमचं टोलेजंग मारुती मंदिरासमोरील स्मारक आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. आम्ही सर्व खालापूरी ग्रामस्थ तुमचे लाख लाख ऋणी आहोत. तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशाने दीपोमय झालेल्या शेकडो विध्यार्थ्यांकडून तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली. आणि गावाच्या सप्ताहात, खंडोबा यात्रेत तुम्ही मनसोक्त डान्स करायचे साधारण राहून सगळ्यांना भेटायचे,आपण साप्ताहात सोबत डान्स केला. जितीन तूझ्याविषयी मला कायम अभिमान वाटतो असं म्हणून तुम्ही गळा भेट घेऊन रडलात आणि म्हणालात गावात बरेच लोक तुझ्याविषयी वाईट बोलतात पण तू ग्रेट आहेस. तुझं सामाजिक काम कायम चालू ठेव असं तुम्ही मला ठणकावून सांगितलं होत.आणि लहान स्वरात सर पिकत तिथं विकत नसत असं मी म्हणालो आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं खूप भावनिक होतात सर तुम्ही, माझ्याकडून तुम्हाला कायम कायम धन्यवाद.तुमचा सगळ्यात राहून गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजे मोठमोठ्या पदावर विराजमान झाली पाहिजे हा अट्टाहास असायचा, मुलगा भरती झाला की अनिल सरांना कॉल करून कृतज्ञता व्यक्त करायचा. सरांनी आम्हाला शिकवलं जीवनात कोणत्याही क्षेत्रात काम करा पण त्या क्षेत्राचे राजा बना टॉप बना असे महान विचार असणाऱ्या आणि माझ्या वयक्तिक शैक्षणिक जीवनात मोलाचे इंग्लिश विषयात ज्ञान देणाऱ्या स्वर्गीय पीएसआय अनिल परजने सरांना विनम्र अभिवादन...
तुमचाच लाडका विद्यार्थी - मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030
Comments
Post a Comment