बीड येथील चंपावती शाळेत कोरो एकल महिला संघटनाचा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
बीड,प्रतिनिधी - कोरो एकल महिला संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 11 महिला कबड्डी संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे निकाल:
प्रथम स्थान: तुळजाभवानी महिला कबड्डी संघ बीड - 5000 रु रोख रक्कम,द्वितीय स्थान: हिरकणी महिला कबड्डी संघ - बीड 3000 रु रोख रक्कम तृतीय स्थान माऊली महिला कबड्डी संघ - 2000 रु रोख रक्कम
सर्व विजेता संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणे आणि आनंद घेतला.
सन्मानित व्यक्ती
महिला दिनाच्या निमित्ताने बीड शहरातील पहिल्या बस चालक, मंजुषा रांजणकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सीमा ओस्तवाल , संपादक वैभव स्वामी, संपादक बालाजी जगतकर, संपादक विनोद शिंदे, बीबी वैद्य आणि कोरो इंडिया च्या विनया घेवडे यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाची सुरुवात
महिला कबड्डी स्पर्धेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.
समारोप
स्पर्धेचा समारोप डॉ. प्राचार्य सविता शेटे, शुभांगी कुलकर्णी, कोमल मस्के, विनयाताई आणि आत्माराम वाव्हळ यांच्या हस्ते करण्यात आला. आत्माराम वाव्हळ यांनी या स्पर्धेचे दिवसभराचे सूत्रसंचालन केले.
विशेष समर्थक व उपस्थित लोक: कोरो इंडिया टीमच्या दीपक निकाळजे, विलास मगरे, निखिल दादा, अनिता खंडागळे इत्यादी सर्व उपस्थित होते. तसेच चंपावती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक गंधे सर यांचे ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले.या कार्यक्रमासाठी शिल्पा पंडित, पूजा काळे, आवडताई गायकवाड, अनिता ढोरमारे, छाया गोरे, रुक्मिणी नागापुरे, मंगल कानडे, कौशल्या कळसुले, तारा घोडके, लता सावंत, नौशाद सय्यद आदि संघटना च्या लिडर्स यांनी परिश्रम घेतले
सार्वजनिक उपस्थिती
या कार्यक्रमामध्ये खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली, महिला आणि पुरुष दोन्हींचा उत्साह अभिव्यक्त झाला.
या स्पर्धेने महिलांच्या सामर्थ्याची आणि एकतेची गोड ओळख निर्माण केली आहे, जी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Comments
Post a Comment