सावता सेना महिला आघाडी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी मंदाबाई ठकसेन तुपे यांची निवड
पाटोदा (प्रतिनिधी) महिला दिना निमित्त सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे व सावता सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा स्वातीताई गोरे यांनी महिला दिनाच औचित्य साधून अहिल्या नगरच्या सावता सेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली सौ मंदाबाई ठकसेन तुपे या पहिल्या पासून सामाजिक चळवळी मध्ये काम करतात त्या मानूर गावच्या ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य होत्या त्यांनी ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटवला त्यांनी त्या काळात वार्डातील अनेक विकासाची कामे केली आहेत त्यांनी त्या बरोबरच सहकाराशी पण नाळ जोडलेली आहे सरकार क्षेत्रात त्यांनी 12/12/2018 रोजी तेजस्विनी बहुउद्देशीय सर्व सेवा सहकारी संस्था स्थापन केली त्या या संस्थेच्या अध्यक्षा आहेत तसेच गावांमध्ये बचत गट स्थापन करून महिलांना एकत्र करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्यामुळे त्या कामाची पावती म्हणून सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजांजी गोरे व सावता सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा स्वातीताई गोरे यांनी याची दखल घेऊन आज त्यांची सावता सेनेच्या अहिल्या नगरच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यांना सर्व समाजामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तरी त्यांनी सांगितले की अहिल्यानगर मध्ये सावता सेनेच जाळ जास्तीत जास्त कसं वाढवता येईल ते काम नक्कीच मी करून दाखवील तुम्ही माझ्या वर टाकलेला विश्वास मी निस्वार्थ पणे पुर्ण करील अशी ग्वाही दिली
Comments
Post a Comment