अंबाजोगाई ग्रामीणचे एपीआय राजेंद्र घुगे यांना निलंबित करा - राजेश कांबळे
लहुजी शक्ती सेनेचे शिष्टमंडळ भेटले एसपींना
बीड प्रतिनिधी - लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक राजेश उर्फ सुग्रीव अर्जुन कांबळे हे अंबाजोगाई ग्रामीण एपीआय राजेंद्र लक्ष्मणराव घुगे यांना मौजे वरवटी ता. अंबाजोगाई येथील दलीत महिलेच्या तक्रारीबाबत या संघटनेचा प्रतिनिधी म्हणुन मी भेटावयास गेलो असतांना मलाही यांनी अपमानजनक वागणूक देऊन माझा अपमान केला त्याबाबत एपीआय राजेंद्र लक्ष्मणराव घुगे यांच्यावर 15 दिवसांच्या आत कार्यवाही करावी तसेच या कालावधीत त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यास दिनांक 27/03/2025 रोजीपासुन तीन दिवसीय धरणे आंदोलनास बसणारनार
आमची संघटना सामाजिक कार्यात अग्रेसर आहे व दिनांक 07/03/2025 रोजी मी माझ्या समाजातील व्यक्तींमध्ये वाद झाल्यामुळे मी सदरील लोकांसोबात मी व कार्यकर्ते असे अंबाजोगाई पोलीस ठाणे येथे गेलो असतांना त्या ठिकाणी हजर असलेले ए.पी.आय. राजेंद्र लक्ष्मणराव घुगे यांनी आम्हाला जातीवाचक बोलुन म्हणाले की, ज्यांचे खायचे काही खरे नाही ते लोकं येऊन आम्हाला ज्ञान शिवतात तसेच महारा मांगांना काही कामे नसतात, व येथे येऊन ते खोटया केसेस करतात असे म्हणुन आमचा विनाकारण मानसीक छळ केला व आम्हाला पोलीस स्टेशनमधुन बाहेर काढले, व दिनांक 07/03/2025 रोजी रात्री 9 ते 12 वाजन्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन मधील एपीआय राजेंद्र लक्ष्मणराव घुगे यांच्या कॅवीनमधील सीसीटीव्ही फुटेज द्यावे व एपीआय राजेंद्र लक्ष्मणराव घुगे यांची विभागीय चौकशी करुन त्यांना निलंबीत करण्यात यावे. त्यांच्यावर जातीवाद केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आम्ही संघटना दिनांक 27/03/2025 रोजीपासुन आपल्या कार्यालयासमोर तीन दिवसीय धरणे आंदोलनास बसणार आहोत. तसेच त्यानंतर सर्व परिणामांची जबाबदारी आपणांवर राहिल व सदरील एपिआय राजेंद्र लक्ष्मणराव घुगे वर कोणती कार्यवाही केली ते लेखी पुराव्यानिशी देण्यात यावे, या मागणीसाठी शिष्टमंडळामध्ये राजेश कांबळे विलास (नाना) भिसे, आदित्य मोरे,
राजेभाऊ आवचार,
ऋषिकेश क्षीरसागर
प्रवीण फुले, आकाश गवारे, श्रुतती कानडे,
बाबु मोहाळे, आर्जुन मोहोळे,सारीका गायकवाड आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment