पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी शेख आयेशा यांची निवड जाहीर


बीड प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या बीड जिल्हा पत्रकार संघाची महिला कार्यकारणी पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली. बीडच्या पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वानुमते शेख आयेशा यांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या महिला जिल्हाध्यक्षांसह सर्व महिला कार्यकारणी वरील पदाधिकाऱ्यांना सौ प्राजक्ता सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनी नियुक्तीपत्र देण्यात आले.या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
उर्वरित कार्यकारणी मध्ये सचिव म्हणून प्रा. अनुप्रिता मोरे तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी नायरा मुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नंदा भंडारी आणि कोषाध्यक्ष पदी आरती विजय कोरडे यांच्या निवडी निश्चित करून जाहीर करण्यात आल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सौ प्राजक्ता सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी