"आई"चा स्मृतिदिनी विद्यार्थ्यांना वही पेन वाटप संपन्न
महामानव अभिवादन ग्रुपच्या अभियानाला उत्स्फूर्त मदतीचा हात
बीड प्रतिनिधी -
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेनचे) वाटप कार्यक्रम महामानव अभिवादन ग्रुप गेल्या तीन वर्षापासून राबवत आहे. त्या उपक्रमाला सुरेश ससाने यांनी आईच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ जागतिक महिला दिनी गरजू व होतकरू एकूण 60 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सम्यक समबुद्ध विहार नागोबा गल्ली बीड येथे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी नागोबा गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक शांताराम जोगदंड अध्यक्षपदी तर समता सैनिक दल कंपनी कमांडर सुजाता वासनीक ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले.अँड.तेजस वडमारे,माजी नगरसेवक राजू जोगदंड, के.एस.वाघमारे, दिनकर जोगदंड, प्रशांत वासनिक याची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचाल तर वाचालचे डी.जि.वानखेडे यांनी केले तर सूत्रसंचालन डि.एम.राऊत यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आदर्शाची पुष्प-दीप-धुपाने पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्या सुजाता वासनीक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व मुलासी हितगुज साधताना म्हणाल्या कि मुलं-मुली लहानपणी आईच्या सहवासात जास्त असतात. तरी लहानपणीच पाल्यावर चांगले संस्कार केले तर आजचे बालक पुढे देशाचे उत्तम भविष्य घडवणारे नागरी बनतील. त्यांना सतत महापुरुषांच्या जीवनाची पुस्तके हातात देऊन त्यांच्या चरित्राचे चिंतन मनन करावयास लावून आजच्या मोबाईल डी.जे. च्या जमान्यात महापुरुषांना केवळ डोक्यावर घेऊन न नाचता महापुरुषांचे विचार डोक्यात पक्के ठेवून आपले जीवन जगले पाहिजे असे आवाहन केले.
महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी धानोरा रोड बीड येथे जयंत वासनिक यांनी आपल्या बालमित्रांंबरोबर 19 तारखेला शिवजयंती मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर न नाचता सामाजिक उपक्रमाने संपन्न करून 1000 रुपये शिल्लक उरलेली रक्कम महामानव अभिवादन ग्रुपच्या शालेय साहित्य वाटपाला दान दिली. त्याबद्दल सर्व बालकांचे कौतुक करून मान्यवरांच्या हस्ते सिद्धेश्वर सिरसीकर, शौर्य पिंगळे, श्रीजय पिंगळे अभिजीत कांबळ, अभिजीत कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून सुमन जोगदंड, रमाबाई जोगदंड, जलसाबाई इनकर, शांताबाई वाघमारे, कमलबाई जोगदंड, सविता जोगदंड, निलावती जोगदंड, नागोबा गल्ली येथील या ज्येष्ठ महिलांचा ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ मंत्र "शिका"......, हा मूळ मंत्र लक्षात ठेवून अनेक काबाड कष्ट करून आपल्या मुलांना, नातवांना उच्चशिक्षण दिले. त्यांचा वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालया तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले, महाराणी येशू राणी, महाराणी ताराराणी , डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जीवन चरित्राची पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. आईच्या स्मृतिदिनी येथून पुढेही या अभियानाला व मोफत शिकवणी वर्गाला समाजभान ठेऊन यथायोग्य मदत करत राहण्याचा दृढ निश्चय सुरेश ससाणे यांनी व्यक्त केला. तर राजू जोगदंड व प्रशांत वासनिकी यांनी मुलांसी हितगुज साधून मुलांना पुढील जीवनाच्या वाटचालीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अँड. तेजस वडमारे यांनी केले. कार्यक्रमास श्रीराम सोनवणे, बबन जोगदंड, दीपक वाघमारे, व परिसरातील महिला व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सरणातयने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment