भ्रष्टाचाराची चौकशीसाठी धाराशिव येथील कार्यालयासमोर घंटा बजाव अधिकारी जगाव आंदोलन करणार - वर्षाताई जगदाळे
प्रभारी कार्यकारी अभियंता पानसंबळ व उपअभियंता बोराडेंचा आका कोण ?
भ्रष्टाचाराची चौकशीसाठी धाराशिव येथील कार्यालयासमोर घंटा बजाव अधिकारी जगाव आंदोलन करणार - वर्षाताई जगदाळे
बीड (प्रतिनिधी) बीड येथील सार्वजनिक विभाग म्हणजे आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय अशी अवस्था झाली आहे. एकीकडे तत्कालीन कार्यकारी अभियंता मार्तंडे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर शिरूर येथील शाखा अभियंता असणारे कृष्णा पानसंबळ यांना प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. ती पूर्णपणे नियमबाह्य असून शिरूर येथे गेल्या अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे यापूर्वीही अनेक आरोप झालेले आहेत. तसेच बीड येथील बांधकाम क्रमांक एक चे उपअभियंता बोराडे यांनी बोगस कामांचे बिल काढण्याचा सपाटाच लावला आहे. बोराडे यांच्याकडे वडवणी येथील शाखा अभियंता पदाचा पदभार नियमबाह्य असून दोघांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी अनेकदा करूनही चौकशी करण्यात टाळाटाळ होत असल्याने या दोघांवर कोणाचा वरदहस्त आहे. तसेच यांचा आका कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. धाराशिव येथील विभागीय कार्यालयासमोर दोघांच्या कामाची चौकशी करण्यासाठी घंटा बजाव अधिकारी जगाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य महिला उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी काढले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचे चित्र बीड येथे दिसून येत आहे तत्कालीन कार्यकारी अभियंता मार्तंडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागेवर शाखा अभियंता असणारे कृष्णा पानसंबळ यांना प्रभारी पद देण्यात आले आहे. हा पदभार पूर्णपणे नियमबाह्य असून त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या अभियंता यांना डावलण्यात आले आहे. ही पदोन्नती नियमबाह्य असून याची तात्काळ चौकशी करत कारवाई करण्याची मागणी वर्षा जगदाळे यांनी केली आहे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही यांची चौकशी होत नसल्याने यांचे आका कोण आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच उपअभियंता बोराडे यांनी केलेल्या कामाची सखोल चौकशी व वाटप करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्याची मागणी व तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात वरिष्ठांनी कारवाई न केल्यास लवकरच धाराशिव येथील विभागीय कार्यालयासमोर घंटा बजाव अधिकारी जगाव आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्याच्या महिला उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment