विविध क्षेत्रातील महिलांची फिनिक्स गगनभरारी

काम दमदार पण प्रसिद्धीपासून लांब...

विविध क्षेत्रातील महिलांची फिनिक्स गगनभरारी

जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी आष्टी तालुका युवा पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करणार सन्मान...

महिलादिन विशेष...
आष्टी। प्रतिनिधी 
समाजात काम करत असताना आपलं काम अन् आपण असा मनात निश्चय करून गेल्या अनेक वर्षापासून कुठलीही अपेक्षा न करता आपल्या क्षेत्रात दमदारपणे काम करून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात गगनभरारी घेऊन आपल्या कर्तत्वचा ठसा उमटविला. एक महिला असून ही आपले एक वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आष्टी तालुक्यातील जिगरबाज व कर्तृत्ववान महिलांचा सोमवार दि १० मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आष्टी पंचायत समिती येथील सभागृहात सकाळी ११ वाजता आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्कार देऊन गौरव व सन्मान करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले आहे.
शहरात व ग्रामीण भागात विविध क्षेत्रात काम करून महिला नेहमीच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून 'हम भी किसीसे कम नही' हे अनेक वेळा महिलांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले आहे. महिला ही जगात प्रत्येक क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत मग ते क्षेत्र राजकीय असो किंवा शैक्षणिक औद्योगिक, सामाजिक असो किवा प्रशासकीय असो शेतीशी निगडीत असो. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. अशाच काही महिलांचा ज्या प्रसिद्धीपासून कोसो दूर राहून पडद्या मागची भूमिका दमदार पणे पार पाडत आहेत. 
या पुरस्कार सोहळ्याला उपविभागीय अधिकारी वसीमा शेख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार वैशाली पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हानपुडे, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाणे, पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, नगराध्यक्षा बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, मुर्शदपूर कासारी ग्रामपंचायतीच्या सरपंच शालिनी अशोक मुळे,नायब तहसीलदार बाळदत्त मोरे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ चारूदत्त पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेश तांदळे, केंद्रीय फिल्म सल्लागार समिती मंडळ सदस्य डॉ स्मिता बारवकर
महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता कोमल शिंदे, डॉ प्रियांका सिंघण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, उपाध्यक्ष निसार शेख, सचिव जावेद पठाण, कार्याध्यक्ष अक्षय विधाते, संघटक समीर शेख, सहसचिव संतोष नागरगोजे,कार्यवाहक अतुल जवणे,गहिनीनाथ पाचबैल,कोषाध्यक्ष प्रेम पवळ, संतोष तांगडे, ॲड किशोर निकाळजे, सोपान पगारे,सल्लागार राजेंद्र लाड,संतोष दाणी,बा म पवार,अजय कापरे, विठ्ठल राख, ओंकार कदम, संस्कार लाड,मारूती संत्रे, सचिन पवार आदी परिश्रम घेत आहेत.



राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्काराने सोमवारी यांचा होणार सन्मान

वैशाली मुकुंद साबळे (आदर्श माता ),रेखा भाऊसाहेब घुले(आदर्श शेतकरी महिला ),वंदना परिवंत गायकवाड (आदर्श महिला सरपंच), ब्रह्मकुमारी सुशिला बहेनजी (आध्यात्मिक समाजकार्यातील उत्कृष्ट महिला),कु.डाॅ.शेख मेहविश आरा (आदर्श महिला वैद्यकीय अधिकारी), कीर्ती हांगे (आदर्श महिला शिक्षिका), ॲड स्वाती राजेंद्र जाधव (आदर्श शैक्षणिक व समाजकार्य ), श्रीमती कवडे अनिता साहेबराव (आदर्श ग्रामसेविका), अंकिता राजेंद्र जाधव ( आदर्श ग्राम महसूल अधिकारी), ज्ञानेश्वरी शंकर लांडे (आदर्श पशुधन पर्यवेक्षक महिला अधिकारी), ह भ प पुष्पाताई उमेश जगताप (उत्कृष्ट समाज प्रबोधनकार महिला), दिपाली अशोक काकडे (उत्कृष्ट खेळाडू), बावदाणकर संजीवनी सोपान (आदर्श कृषी सहाय्यक महिला), रुक्मिणी संपत मराठे (आदर्श अंगणवाडी सेविका), सुनिता रामदास जगताप (आदर्श आशा वर्कर), अंजली दिगंबर वाघमारे (उत्कृष्ट सुपरवायजर), सोनाली रुपेश उपाध्ये (उत्कृष्ट महिला उद्योजिका), ॲड पुष्पा भगत- गायकवाड (आदर्श महिला विधीज्ञ ), विजया मुळे (आदर्श समाज कार्य महिला) शिवनेरी महिला बचत गट पांढरी (आदर्श महिला बचत गट), वंदना सुरेश भैसाडे (आदर्श परिचारिका), वैष्णवी नामदेव रांगुळे (आदर्श कवियत्री), पूजा बिबीषण देवळकर- धोंडे (आदर्श महसूल सेविका), अर्चना सुभाष आरडे (उत्कृष्ट महिला पोलीस कर्मचारी), कल्पना गणेश पाटील (आदर्श सून ), सविता उगले (आदर्श सेविका), कोमल थेटे ( उत्कृष्ट रांगोळी महिला आर्टिस्ट), सुनिता नाथा शिंनगारे (उत्कृष्ट आशा वर्कर) या विविध क्षेत्रातील महिलांचा सोमवारी सकाळी ११ वाजता आष्टी पंचायत समिती सभागृहात महिला दिनानिमित्ताने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व फेटा बांधून 'नारी सन्मान २०२५' हा पुरस्कार देऊन आष्टी तालुका युवा पञकार संघ गौरव करणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी