असंख्य कार्यकर्ते घेऊन मस्साजोग ते बीड सद्भावना पद यात्रेमध्ये सहभागी होणार- पॅंथर जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे



बीड जिल्ह्यामध्ये विषमतेचे वीस पेरून गढूळ केल्या जात असलेल्या या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वसामान्य निर्दोष माणूस भरडला जात आहे. 
जाती-जातीमध्ये वाढत चाललेली दोष भावना आणि त्यातूनच निर्माण होणारे दुष्परिणाम अराजकता कायदा सुव्यतेचे प्रश्न गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारे बळ या सर्व सामाजिक संतुलन नष्ट करणाऱ्या प्रवृत्ती पासून समाजाला व पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी राष्ट्रीय इंदिरा काँग्रेस पक्षाच्या व काही सामाजिक संघटना इतर काही पक्ष या सर्वांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. असून मस्साजोग, केज येथून बीड पर्यंत दिनांक 08/03/2025 ते दिनांक 09/03/2025 रोजी काढण्यात येणाऱ्या सद्भावना पद यात्रेमध्ये काँग्रेस व इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असंख्य तरुण व समाज बांधव या पद यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

समाजामध्ये न्याय न्यायव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी सद्भावना जागृत राहणे गरजेचे आहे सामाजिक सलोखा एक्य वाढविण्यासाठी सद्भावना यात्रेचे आयोजन उपयुक्त ठरू शकते तरी आयोजकांनी सद्भावना यात्रेसारखा स्तुप्त उपक्रम हाती घेऊन दिलेल्या आमंत्रणचे आभार मानून सद्भावना यात्रेसारख्या स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार संघटनेच्या वतीने मानतो.

 आम्ही सर्व बीड जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते समाज बांधव सद्भावनेचे खरे अनुयायी म्हणून मोठ्या संख्येने सद्भावना यात्रेमध्ये सहभागी होणारा आहोत. 

तरी बीड जिल्ह्यातील समस्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सद्भावना यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्ह्याच्या वतीने विनम्र आव्हान करण्यात येत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी