क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पेठ बीड सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर
बीड प्रतिनिधी- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गेल्या पंधरा वर्षांपासून पेठ बीड भागात विशेष उत्साहाने साजरी केली जाते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली, या जयंती उत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अक्षय कोकाटे यांच्या संकल्पनेतून यावर्षीची कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये प्रबोधन व्याख्यान, सांस्कृतिक संगीत रजनी, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, तसेच भव्य मिरवणूक यांचा समावेश असणार आहे.
या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी नवीन उत्सव कार्यकारणीची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अध्यक्षपदी विशाल चांदणे,उपाध्यक्ष पदी राहुल कोकाटे,कोषाध्यक्ष कपिल ढाकणे,सचिव तुषार ईनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर सदस्यांमध्ये योगेश गायकवाड, आकाश कोरडे, सोनु शिंदे, बबलू वाघमारे, सागर धन्वे, शुभम कोकाटे, तुषार मौरे, आणि अभिजित कोकाटे यांचा समावेश आहे.
या सन्माननीय कार्यकारणीच्या निवडीनंतर, जयंती उत्सवाचे आयोजन करण्यासाठी अधिराज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, जेणेकरून महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य जनसंपर्कांत आणता येईल.
Comments
Post a Comment