लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी लहुरी ता. केज संबंधित बोगस कागदपत्रांचा पर्दाफाश



 केज प्रतिनिधी - लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी लहुरी ता. केज ही बोगस व बनावट कागदपत्रांच्या आधारे स्थापन करण्यात आली असून, यामुळे शासनाची मोठी फसवणूक झाली आहे. बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या 346 वि‌द्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्रे परस्पर जात पडताळणी विभागामार्फत हस्तगत करण्यात आली आहेत. यामुळे शासनाकडून मिळवलेले 41 कोटी रुपये त्यामध्ये वस्त्रो‌द्योग विभागाकडून 27 आणि समाज कल्याण विभागाकडून 14 कोटी रुपयांच्या रकमेची शासनाची फसवणूक झाली आहे. तसेच या सूतगिरणीने ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना घेतलेला नाही. फसवणूक संदर्भात ज्या व्यक्तींचे नाव समोर येत आहे, त्यात माजी आमदार संगीता ठोंबरे आणि चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे यांचा समावेश आहे. केज पोलीस उपविभागीय अधिकारी कमलेश मीना यांच्या वर्तमनातील कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण दीड वर्षांपासून याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहसचिव आणि पोलीस महानिरीक्षकांनी आदेश दिले होते. तथापि, केज पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या सर्व घटनाक्रमाबाबत, तक्रार करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या तक्रारदारांना पोलिसांकडून दबाव तंत्राचा वापर करण्याचीही बाब समोर आली आहे. प्रमुख निवेदनः पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या बीड जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे या प्रकरणाची आठ दिवसांत उच्चस्तरीय चौकशी व गुन्हा नोंद न झाल्यास, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि केज पोलीस स्टेशनच्या विरोधात मुंबई आझाद मैदानावर दि. 21 मार्च 2025 रोजी पासुन आमरण उपोषण करण्यात येणार आहे. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे सुतूगिरणीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, ही आमची मागणी आहे.


 अनिल तुरुकमारे 
 बीड जिल्हाध्यक्ष 
 पीपल्स रिपब्लिकन पार्टी

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी