श्रीसर्वतीर्थ सेवा महानुभव आश्रम बक्तरपुर द्वारा स्थानवंदन पदयात्रेचे लिंबागणेश येथे जल्लोषात स्वागत
----
लिंबागणेश:- ( दि.११) महानुभव पंथाचे संस्थापक,थोर समाजसुधारक तत्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या आदरणीय परमपूज्य महंत कानळसकर बाबा महानुभव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.६ मार्च रोजी आष्टी तालुक्यातील वाकी येथुन शुभारंभ झालेली पदयात्रा शिराळा, पारगाव जोगेश्वरी आष्टी,मातकुळी,वनदेव,रामदरा,सौताडा,साकत, पाटोदा, वैद्यकिन्ही,लिंबागणेश,पोहिचा देव,पाली आणि बीड येथे समाप्ती होणार आहे. पदयात्रेचे हे विसावे वर्ष आहे. श्रीसर्वतीर्थ सेवा महानुभव आश्रम बक्तरपुर स्थानवंदना पदयात्रेचे आज दि.११ मंगळवार रोजी सकाळी बीड तालुक्यातील लिंबागणेश नगरीत घरासमोर रांगोळी, औक्षण करत आतीशबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात चक्रधर स्वामी मंदिरात महानुभव भक्तांच्या वतीने बाबांचे शाल श्रीफळ आणि पुष्पहार करून स्वागत करण्यात आले.श्रीकृष्ण मंदिरात
विडा,आवसर, देवाला आरती करून महंत कानळसकर यांचे सुश्राव्य प्रवचन झाले.चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन स्थांनांची महती सविस्तर विशद करून सांगितली.दुपारी
देवाला उपहार करून भोजन करण्यात आले.भोजनाची व्यवस्था श्रीकृष्ण मंदिर देवस्थान व गावातील महानुभव भक्तांच्या वतीने करण्यात आली होती. यावेळी बाळुकाका पाटोदकर, राजाभाऊ गिरे, अर्जुन गिरे,अनंतकाका मुळे, भालचंद्र गिरे,गोवर्धन गिरे, सुदाम मुळे, तुळशीराम वनवे,किसन आबदार , ज्योती पाटोदकर आशाबाई गिरे,सिंधुबाई गिरे, ज्योती गिरे,उषाबाई मुळे व भाविक उपस्थित होते. दुपारचे भोजण आणि विश्रांती नंतर पदयात्रा पोहिचा देव कडे मार्गस्थ झाली.
Comments
Post a Comment