वित्त व नियोजन मंत्री पालकमंत्री बीड अजितदादांनी ८२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आणि जलजीवन मिशनच्या कामांना निधी द्यावा या मागणीसाठी लक्ष्यवेधी विकासाचे गाजर वाटप आंदोलन
वित्त व नियोजन मंत्री पालकमंत्री बीड अजितदादांनी ८२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आणि जलजीवन मिशनच्या कामांना निधी द्यावा या मागणीसाठी लक्ष्यवेधी विकासाचे गाजर वाटप आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.१० ) उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार असून बीड जिल्ह्यातील ८२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असुन त्यासाठी आवश्यक १ कोटी ३२ लाख रूपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाला दोन महिन्यांपासून केलेली असुनही अद्याप निधी मिळाला नाही. बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांसाठी निधीचा तुटवडा निर्माण झाला असुन २५० कोटी रुपयांचा निधी शासनाने द्यावा अशी जिल्हा प्रशासनाकडुन शासनाला मागणी करण्यात येऊन केवळ १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असुन तातडीने उर्वरित निधी देण्यात यावा या प्रमुख मागण्यांकडे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांचे लक्ष्य वेधण्यासाठी आज दि.१० सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली " अजितदादांच्या विकासाचे गाजर वाटप" लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत अजितदादा पवार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात रामनाथ खोड,शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार ,,शेख मुबीन,शेख मुस्ताक, पांडुरंग हराळे, बीड जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी अशोक येडे, बीड जिल्हा सचिव इंटक सखाराम बेंगडे आदी सहभागी होते.
बीड जिल्ह्यातील ८२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय अनुदानापासुन वंचित; आवश्यक १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी तातडीने देण्यात यावा
बीड जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत २०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे.यापैकी १०८ कुटुंबियांना मदत देण्यात आली असुन ६३ जणांना मिळणे बाकी आहे. मागच्या वर्षातील ६३ आणि चालु वर्षातील १७ अशी एकुण ८२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित आहेत. महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीची चावी हाती असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असुनही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असणे हि अशोभनीय बाब आहे . यासाठी आवश्यक १ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने करून दीड महिना उलटुनही अद्याप निधी मिळाला नाही.बीडच्या विकासाचे व्हिजन दाखवणा-या अजितदादांनी विकासाचे गाजर बीडकरांच्या हाती दिल्याची जनमाणसात भावना असुन तातडीने मदतनिधी द्यावा.
जलजीवन मिशनच्या कामांसाठी २५० कोटी निधीची मागणी असुन केवळ १४ कोटी प्राप्त, उर्वरित निधी द्यावा :- डॉ.गणेश ढवळे
केंद्र सरकारने हर घर जल देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याची योजना कार्यरत केली असुन बीड जिल्ह्यात १२२३ गाव आणि वाड्यांची संख्या आहे. पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी ११८४ जुन्या आणि आता नव्याने ८१ अशी एकूण १२६५ पाणीपुरवठा कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यात ० ते २५ टक्के कामे झालेली ८६ तर २५ ते ५० टक्के कामे झालेली १८० तर ५० ते ७५ टक्के कामी झालेली ३८७ कामे तर ७५ ते ९९ टक्के कामे पूर्ण झालेली ३२७ कामे आहेत. यात २४६ कामे पुर्णत्वाकडे असून ३३ योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेल्या आहेत. मागील ८ महिन्यापासून जलजीवन मिशन साठी निधीचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने २५० कोटी रुपये निधीची मागणी शासनाकडे केलेली आहे. मात्र केवळ १४ कोटी रुपये निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे पालकमंत्री बीड य अजित दादा पवार यांनी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment