महाबोधी महाविहार (बोधगया बिहार राज्य) मुक्ती आंदोलन संदर्भात अंबाजोगाई येथे 18 मार्च 2025 रोजी भव्य मोर्चाचे बौद्ध समाजाकडून आयोजन
महाबोधी महाविहार (बोधगया बिहार राज्य) मुक्ती आंदोलन संदर्भात अंबाजोगाई येथे 18 मार्च 2025 रोजी भव्य मोर्चाचे बौद्ध समाजाकडून आयोजन....
अंबाजोगाई प्रतिनिधी - बिहार राज्यातील महाबोधी महाविहार गेल्या कित्येक वर्षापासून बौद्धांच्या ताब्यात दिले गेले नाही यासंदर्भात अनेक आंदोलने झाली परंतू सरकारने त्याची दखल घेतली नाही. परंतु गेली 18 दिवसांपासून बौद्ध भिक्खू बोधगया मध्ये आंदोलनास बसलेले असून या आंदोलनास समर्थन म्हणून अंबाजोगाईतील बौद्ध समाज म्हणून भारतीय बौद्ध महासभा यांच्या पुढाकाराने भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चातील प्रमूख मागणी महाबोधी बौध्द विहार मंदीर कायदा 1949 रद्द करण्यात यावा. महाबोधी बौध्द विहाराचे सर्व व्यवस्थापन बौद्ध च्या हाती देण्यात यावे.
महाबोधी बौध्द विहारातील ब्राह्मणाचा हस्तक्षेप बंद करण्यात यावा. अश्या आहेत.
हा मोर्चा 18 मार्च रोजी सकाळी ठीक 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई या मार्गाने मार्गस्थ होणार आहे तरी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष प्रा. बी.बी.धनवे यांनी आवाहन केले आहे, या अस्तित्वाच्या सन्मानाच्या लढ्यात सामील होत आंदोलनाला समर्थन देणे हे बौद्धांच प्रथम कर्तव्य म्हणत हजारो बौद्ध यात ताकदीने सहभागी होणे होणार असल्याची माहिती आहे.
यासंदर्भात दिनांक 08 मार्च रोजी संपूर्ण बौद्ध समाजातील प्रतिनिधीनी एकत्र आज उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे यासंदर्भात निवेदन सादर केले असून या निवेदनावर ॲड. बाबासाहेब बी.धन्वे , जगन सरवदे, डी एन घोबाळे, गोविंद मस्के,मारोती सरवदे, व्यंकट वेडे, महादेव आदमाने , रामराजे सरवदे, नामदेव आचार्य , नितिन सरवदे , भावनाताई कांबळे , सुधाताई जोगदंड, शोभाताई जाधव, ॲड दिलीप गोरे, ॲड एस के पठाण, ॲड. तुपसागर, शोभाताई जोगदंड , संजीवनी धनवे, माया बनसोडे शोभा ओव्हाळ, प्रा.राहुल सुरवसे , गौतम सरवदे, रखमाजी जोगदंड, रमाकांत व्हावळे, रामजी कासारे, अर्जुन वाघमारे , जीवन सोनकांबळे , विजय कांबळे, सतिश मस्के, कालिदास सुरवसे, महादेव भालेराव, विजय मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment