पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद जवळा फकीर येथे मोठ्या हर्ष उल्लासात संपन्न
धारूर प्रतिनिधी - धारूर तालुक्यातील जवळा फकीर येथे दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेस मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. धारूर तालुक्यातील फकीर जवळा येथे संपन्न झालेल्या पहिल्या धम्म परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ भदंत उपगुप्त महाथेरो पूर्णा हे उपस्थित होते. पहिल्या सत्रामध्ये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण त्रिशरण पंचशील ग्रहण करून करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण धम्म परिषदेचे मुख्य आयोजक भदंत पयातीस महा थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. पहिल्या धम्म परिषदेचे आयोजन जवळा फकीर येथील मृगदयावान महाविहार बौद्ध धम्मसंस्कार शिक्षण संस्था जवळा फकीर तालुका धारूर जिल्हा बीड येथे करण्यात आले होते. या संस्थेच्या उभारणीसाठी परिसरातील गवळी नामक शेतकऱ्यांनी स्वतःची एक एकर जमीन ही दान म्हणून दिलेली आहे. त्याच जागेवर या अखिल भारतीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला कार्यक्रम घेण्यात येतो, या ठिकाणी धम्म हॉलची उभारणी देखील सध्या सुरू आहे. धम्म परिषदेचे प्रस्ताविक आयोजक भदंत पय्यातीस महाथेरो यांनी केले. तर भदंत उपगुप्त महाथेरो पूर्ण, भदंत इंदूवस महाथेरो,भदंत पयारत्न थेरो, भदंत भैय्या बोधि थेरो, भदंत पयानंद थेरो भिकू संघरत्न हे होते, तर उपस्थितीमध्ये प्रा. प्रदीप रोडे आले होते. तर धम्मदेशना कार्यक्रम भोजनदानाच्या नंतर संपन्न झाली. त्यापूर्वी उपस्थित भिकू संघाचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी भदंत पयानंद यांनी धम्मदेशना देते प्रसंगी श्रीलंकेमधील भंते यांनी एका पादरीस स्वतःची किडनी दान करून दान परमिता ही कशा पद्धतीने असते हे सांगितले, ज्यामध्ये सदरील भंते यांना दान करायचे असताना एका पादरीस किडनीची आवश्यकता होती. तर भंतेंनी त्यांना किडनी दान दिली यावेळी पादरींचे बंधू हे डॉक्टर असल्या कारणाने त्यांना लागलीच कळाले की त्यांच्या भावाला पण त्यांनी किडनी दान दिली आहे, तर भत्तेना डॉक्टर बंधुने चार लाख रुपयांची भेट देण्याचे ठरवले परंतु भंतेंनी जर चार लाख रुपये घेतले तर दानपरमिता पूर्ण होणार नाही म्हणून ती भेट नाकारली या पद्धतीनेच दानपरिमितेचे महत्त्व भदंत पयानंद यांनी उपस्थित उपासक उपासिकांना सांगितले तसेच मृगदयावान महाविहारास परिसरातील नागरिकांनी धम्मदान देऊन विहारात आपले मोलाचे असे योगदान द्यावे असेही सांगितले. धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी माजी शिक्षक रोहीदास मोतिराम गवळी अनिता रोहीदास गवळी,जानकीराम मोतिराम गवळी, लताबाई जानकीराम गवळी,पो.पा.लिबाजी चागुजी गवळी, पवित्राबाई लिंबाजी गवळी,नरहरी चागुजी गवळी, गंगाबाई नरहरी गवळी,साधु कांबळे,साखरबाई साधु कांबळे,माजी शिक्षक दिलीप पंढरी कांबळे धाराशिव आदींचे सहकार्य लाभले. न्यूज २३ मराठी या न्यूज पोर्टलने संपूर्ण धम्म संपूर्ण फेसबुक वरून लाईव्ह प्रसारित केली.
जमीन दानदाते
प्रभाकर सोनबा गवळी व शांतिप्रिया प्रभाकर गवळी यांनी 1 एकर जमीनदान दिली.तर
अन्नदान दान - रुक्मिणी पंढरीनाथ हिरवे व पंढरीनाथ सखाराम हिरवे यांच्या कुटुंबीयांकडून पहिल्या अखिल भारतीय बौद्ध धम्मपरिषदेसाठी आलेल्या सर्व उपासक उपासिकांसाठी अन्नदान करण्यात आले व भिकू संघाला भोजनदान लताबाई भाऊराव गवळी यांनी दिले. आश्रुबा सौंदरमल यांनी धम्म परिषदेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या जार व्यवस्था त्यांनी केली. धम्म परिषदेसाठी लावण्यात आलेल्या सर्व होर्डिंग बॅनरचे दान डॉ.संजय नाकलगावकर दिले. बीडच्या स्नेहल रमेश खंडागळे यांनी गोदरेजचे कपाट दान दिले तसेच उपस्थित अनेकांनी धम्मप्रेमी बांधवांनी यावेळी रोख स्वरूपात धम्मदान दिले आहे .
Comments
Post a Comment