आष्टी तालुक्यातील मौजे सोलापूर वाडी येथे ब्रह्मलीन माणिक गिरी महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह/ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
      मौजे सोलापूर वाडी सह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी गुरुवारी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा - सप्ताह कमिटी/ग्रामस्थांचे आवाहन 
आष्टी( प्रतिनिधी --गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे सोलापूर वाडी  येथे ग्रामस्थांच्या वतीने ब्रह्मलिन मानिक गिरी महाराज यांच्या द्वितीय मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं . 
  या कार्यक्रमात नामवंत कीर्तनकारांनी किर्तन सेवा देण्यात आली असून  ,  कार्यक्रमांमध्ये गावातील आबाल वृद्धांनी मोठ्या संख्येने ज्ञानेश्वरी पारायणासाठी सहभाग नोंदवला .कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असून  , या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठ चालक म्हणून ह भ प आदिनाथ महाराज जाधव,  ह भ प जनार्दन थोरवे , व ह भ प विष्णु महाराज थोरवे यांनी सेवा दिली असून  ,  या कार्यक्रमासाठी गायक माऊली महाराज वाबळे , भरत महाराज वाळके , व मृदंगाचार्य नारायण महाराज,  भालसिंग गणेश महाराज थोरवे यांनी साथ संगत केली . 
   कार्यक्रमासाठी पंचक्रोशी येथील सर्वच भावी भक्तांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला असून,  गुरुवार दिनांक २०/०२/२०२५  रोजी सकाळी १०:३०  ते १या वेळात काल्याचे कीर्तनाने  सप्ताहाची सांगता होणार असून , मौजे सोलापूर वाडी सह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा , असे आवाहन मौजे सोलापूर वाडी सप्ताह कमिटी/ग्रामस्थ यांनी केले असून, या सप्ताहाचे जाहिरात सौजन्य गावचे सरपंच मनोज (दादा )नामदेव थोरवे यांनी केले .या काल्याचे किर्तन हरिभक्त परायण राम महाराज डोंगर जाट नांदूर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाचे सांगत होणार आहे  . 
 काल्याचे महाप्रसादाचे अन्नदाते ह भ प त्रिंबक( तात्या ) थोरवे माजी सरपंच खुंटेफळ यांच्यावतीने पंगत देण्यात येणार असून, पंचक्रोशीतील सर्व भाविक /भक्तांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ सोलापूर वाडी सह ह भ प त्रिंबक( तात्या ) थोरवे यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे  .
Comments
Post a Comment