२ हजार १८३ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशासाठी निवड
२ हजार १८३ विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशासाठी निवड
२ हजार १८३ विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश
पडताळणी समितीने चोक पणे कागदपत्रांची पडताळणी करावी - मनोज जाधव
१४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करता येणार
बीड (प्रतिनिधी) २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी शिक्षण आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे काढण्यात आली. यात जिल्ह्यातील २ हजार १८३ विद्यार्थ्यांची इंग्रजी शाळेत मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना १४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियात १४ जानेवारी ते २ फेब्रुवारी पर्यंत पालकांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. यात जिल्ह्यातील २१४ खासगी शाळांत २ हजार २३५ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध होत्या या जागा करिता ५ हजार ७८१ इतके अर्ज प्राप्त झाले होते. यातून आता २ हजार १८३ विद्यार्थ्यांची मोफत प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. आरटीई २५ टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तालुकास्तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पडताळणी समिती स्थापन केल्या आहेत. पडताळणी समिती कागदपत्रांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करतील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे. त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने देऊन कागदपत्रांची पडताळणी करत आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत.
पडताळणी समितीने चोक पणे कागदपत्रांची पडताळणी करावी - मनोज जाधव
पडताळणी समितीने चोक पणे कागदपत्रांची पडताळणी करावी, पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी खोटी, चुकीची माहिती भरून किंवा खोटे कागदपत्र तयार करून प्रवेश निश्चित करत असतील तर निवड समितीच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश नियमानुसार रद्द करण्यात यावा . २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने पद्धतीने राबविली जात असून, यात कसलाही मानवी हस्तक्षेप नाही. तेव्हा पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील, तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिवसंग्राम चे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केले आहे.
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५ - २६ या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .
Comments
Post a Comment