आजपासून श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान महाशिवरात्री महोत्सवास प्रारंभ ; सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा ; महंत शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज



लिंबागणेश:- ( दि.२०) बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान मौजे बेलगाव पो. लिंबागणेश याठिकाणी दि.२० ते २७ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री महोत्सव संपन्न होत आहे. त्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड विनावादन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा अखंड पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मार्गदर्शक श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान मठाधिपती ह.भ.प. महंत महादेव बाबा भारतीजी व कार्यक्रमाचे आयोजक ह.भ.प.शांतीब्रम्ह तुकाराम महाराज भारती , महोत्सव कमिटीने केले आहे. आज दि.२० गुरुवार रोजी महोत्सवास प्रारंभ झाला असुन सकाळी भगवान बेलेश्वर महादेवास अभिषेक,ध्वजपुजन करत श्री गणपती पुजनास सकल संतांचे वंदन केले.त्यानंतर वीणा,पखवाज,पेटी यांचे पुजण करण्यात आले. समस्त भाविक भक्तांच्या उपस्थितीत वीणा उभारण्यात आला. महोत्सव कमिटीच्या वतीने पंचक्रोशीतील उपस्थित सरपंच, उपसरपंच, गावातील प्रतिनिधी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ह.भ.प. शिवचरित्र बबन महाराज मंझरीकर हवेली ,दि.२१ शुक्रवार रोजी ह.भ.प. युवा किर्तनकार अक्षय महाराज पिंगळे बीड,दि.२२ शनिवार रोजी ह.भ.प. रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे चकलांबा दि.२३ रविवार रोजी ह.भ.प.वारकरी भुषण राम महाराज डोंगर आळंदी,दि.२४ सोमवार रोजी ह.भ.प. रामहरी महाराज वायबसे सावरगाव ( सोने) दि.२५ मंगळवार रोजी ह.भ.प. प्रेममुर्ती धर्मराज ( दादा) महाराज श्रीक्षेत्र सामनगाव गुरूपीठ,दि.२६ बुधवार रोजी ह.भ.प.विनोदाचार्य दिपक महाराज बादाडे माजलगाव यांचे किर्तन होणार असुन दि.२७ गुरुवार रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे , अध्यक्ष बंकटस्वामी संस्थान नेकनुर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे.

विविध धार्मिक कार्यक्रम 

बेलेश्वर संस्थान बेलगाव येथील महाशिवरात्री महोत्सवात काकडा,भजण, शिवलीलामृत पारायण, गाथा पारायण, भावार्थ रामायण, हरिपाठ,हरिकिर्तन,जागर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या सप्ताहात लिंबागणेश पंचक्रोशीतील भजणी मंडळ उपस्थित राहणार आहेत.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी