नटेश्वर बेदरकर यांच्या अचानक गायब होण्याने खळबळ



हारकी लिमगाव येथील प्रकरण; पोलिसात तक्रार दाखल 

माजलगाव : तालुक्यातील हारकी लिमगाव येथील शेतकरी नटेश्वर मुकुंद बेदरकर हे दिनांक २२ फेब्रुवारी रोजी अचानक गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात रितसर तक्रार नोंदविली आहे. 

 या बाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील हारकी लिमगाव येथील रहिवाशी नटेश्वर मुकुंद बेदरकर (वय ३९) हे शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ९:४५ वाजेच्या सुमारास बीड येथून गायब झाले आहेत. या प्रकरणाने खळबळ उडाली असून त्यांच्या गायब झाल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड येथे बेदरकर कुटुंबियांनी रितसर तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर हे कसून तपास करत आहेत. दरम्यान, नटेश्वर बेदरकर यांच्या अचानक गायब होण्याने संपूर्ण बेदरकर कुटुंबीय भितीच्या सावटाखाली वागत आहेत.



बेदरकर गायब प्रकरणाचा छडा लावणार : नवनीत काॅवत

नटेश्वर बेदरकर गायब प्रकरणी आज मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी त्यांचे बंधू प्रसाद बेदरकर यांच्यासमवेत नातेवाईकांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन या प्रकरणाचे धागेदोरे लावण्याची मागणी केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक काॅवत यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून लवकरच छडा लावू, अशी माहिती दिली.



कुटुंबियांना मात्र अपहरण झाल्याची शंका?

 नटेश्वर बेदरकर यांच्या अचानक गायब होण्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस कसून तपास करत आहेत. मोबाईल सीडीआर आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र असे असले तरी कुटुंबियांना काही समाज विघातक शक्तींकडून अपहरण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दिशेने सुद्धा पोलीस आपल्या तपासाची चक्रे वळवू शकतात.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी