रोहन गलांडे यांचे विविध मागण्यासाठी अमरण उपोषन
मागण्या मान्य नाही झाल्या तर २८ तारखेला आमरण उपोषण
केज/ प्रतिनिधी
केज येथील विविध मागण्यासाठी जरांगे पाटील समर्थक रोहन गलांडे पाटील यांनी २८ फेब्रुवारी २०२५ तारखेला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे या विषयी निवेदनाद्वारे मागण्या आहेत .शासन आदेशानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरु करणे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अमरण उपोषन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देतो असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे तसेच केज पंचायत समितीचे बीडीओचे अधिकार ग्रामसेवक कडे देणाऱ्या बीडीओ दिवाने यांच्या वर व ग्रामसेवक ओम चोपणे यांच्या वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा २८ फेब्रुवारी रोजी अमरण उपोषन करण्यात येईल तसेच चिंचोली माळी ते हादगाव मंजूर रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा २८ फेब्रुवारी रोजी अमरण उपोषन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांना दिला आहे तसेच केज तालुक्यातील काळेगाव येथील जलजिवन मिशन अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या मान्य झाल्या नाहीत तर श्री संत नामदेव महाराज सभागृह चिंचोली माळी येथे २८ फेब्रुवारी रोजी अमरण उपोषन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला रोहन गलांडे पाटील यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment