परळीत पोलिसांच्या आशीर्वादाने हातभट्टी विक्रेत्यांचा नंगानाच
दोन वर्ष लढा देऊन देखील पोलीस कारवाई करेणा
परळीतील शिष्टमंडळ आलं पोलीस अधीक्षकांना भेटण्यास
बीड प्रतिनिधी - परळी तालुक्यात गेल्या 30 ते 35 वर्षापासून हातभट्टी वाल्यांचा वेळखा वाढत चालला आहे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून अनेक नागरिक या हातभट्टी बंद करण्याच्या मागण्या करत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात परळीत आंदोलन देखील करण्यात आली मात्र पोलिसांनी फक्त आश्वासन दिले यामध्ये नागरिक थेट आता पोलिसांच्याच आशीर्वादाने परळीतील हातभट्टी चालत असल्याचा आरोप करत आहे. यासाठी आज परळीतील एक शिष्ट मंडळ पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे परळीतील हातभट्टी बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळात वैजनाथ जगतकर माजी नगराध्यक्ष, नितीन रोडे, सोपान ताटे, संजय जगतकर, बालासाहेब गायकवाड, भैय्यासाहेब आदोडे, महादेव रोडे, रवी रोडे,अंबादास रोडे, रवींद्र रोड, शीलभद्र ताटे, अनंत कांबळे, भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. निवेदन पण देण्यात आले आहे. यावेळेस परळीतील पोलीस अधीक्षक यांना भेटण्यास आलेल्या नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केलेला पाहायला मिळतोय आता नेमकं या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाला पोलीस अधीक्षक हे साथ देणार का या हातभट्टी गेल्या अनेक वर्षांपासून परळीतील युवकांचा जीव घेताय हे थांबणार का हे पाहणं गरजेचं आहे.
गणेश पार येथे बंद पडलेली पोलीस चौकी काल रात्री देवी मंदिर परिसरात देण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे केली आहे. एका महिन्याभरात कारवाई न झाली तर पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार आहे. असेही सांगितले.
Comments
Post a Comment