पिण्याच्या पाण्यासाठी मनसे आक्रमक !तीन दिवस आड पाणी न दिल्यास,नगरपालिका विरोधात बोंब मारो आंदोलन
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पाली येथील धरण व माजलगाव येथील धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नगरपालिकेच्या नकारत्यापणामुळे बीड शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती व पैसे मोजावे लागत आहे मात्र नगरपालिकेला जाग येत नसल्याने तीन दिवस आड पाणी न सोडल्यास तसेच शहरातील कचऱ्याचा निपटारा वेळेवर न केल्यास नगरपालिका विरोधात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे शहराध्यक्ष अमरजान पठाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे माजलगाव येथील बॅक वॉटर धरण व पाली येथील बिंदूसरा धरणात यंदा चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे मात्र नगरपालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे बीड शहरात तब्बल वीस ते पंचवीस दिवस पिण्याचे पाणी येत आहे यामुळे बीड शहरातील नागरिक हैराण झाले आहेत पाणीपट्टी वेळेवर घेणारे नगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांना पाणी वेळेवर देणार आहेत का असा सवाल उपस्थित करत शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस आड सुरळीत न केल्यास बीड नगरपालिकेसमोर पाण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मनसेच्या वर्षा जगदाळे, सदाशिव बिडवे ,अमरजान पठाण यांनी आंदोलनाचे निवेदन दिले आहे.
Comments
Post a Comment